Bharat Jodo Nyay Yatra: राहुल गांधी यांची 'भारत जोडो न्याय यात्रा'लवकर संपवणार, जाणून घ्या कारण
Rahul Gandhi | (Photo courtesy: archived, edited, symbolic images)

राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी भारत जोडो न्याय यात्रा (Bharat Jodo Nyay Yatra) सध्या सुरु आहे. पण या यात्रेला ब्रेक लागण्याची शक्यता आहे. नियोजित वेळापत्रकापेक्षा ही यात्रा लवकर संपवण्यात येणार असल्याचा विचार काँग्रेस (Congress) करत आहे. याचं कारणही समोर आलं आहे. ही यात्रा या आठवड्यात उत्तर प्रदेशमध्ये (Uttar Pradesh) प्रवेश करणार होती आणि 80 लोकसभा जागा असलेल्या राजकीयदृष्ट्या महत्त्वपूर्ण राज्यात 11 दिवस घालवणार होती. राहुल गांधींना लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी अधिक वेळ मिळेल. सूत्रांनी सांगितले की, प्रियंका गांधी या आत्तापर्यंत या यात्रेत सहभागी झालेल्या नाहीत. पण यात्रा उत्तर प्रदेशात प्रवेश केल्यावर त्या हजेरी लावू शकतात. ( Lok Sabha Election 2024: पंजाबपाठोपाठ आता दिल्लीतील 7 ही जागांवर निवडणूक लढवण्याची अरविंद केजरीवाल यांची घोषणा)

उत्तर प्रदेशात यात्रेमध्ये बदलण्याचा आणि आरएलडीबाबत घडत असलेल्या घडामोडींचा संबंध नाही. तर राहुल गांधींनी यात्रेदरम्यान लोकांशी जास्तीत जास्त संवाद साधता यावा यासाठी आम्ही त्याचा वेग कमी करण्याचा विचार करत आहोत. असे काँगेसकडून सांगण्यात येत आहे.

नितीश कुमार यांच्या जनता दल (युनायटेड), तृणमूल काँग्रेस आणि आम आदमी पक्षाच्या पश्चिम बंगाल आणि पंजाबमध्ये एकट्याने निवडणूक लढवण्याच्या निर्णयामुळं आघाडीत सध्या गोंधळाचं वातावरण आहे. तसंच आता आरएलडी देखील इंडिया आघाडीतून बाहेर पडण्याची शक्यता आहे. पुढील महिन्यात मुंबईत होणाऱ्या भारत जोडो न्याय यात्रेच्या समारोपावेळी काँग्रेस आपल्या सर्व इंडिया आघाडीच्या सदस्यांना रॅलीसाठी आमंत्रित करण्याची शक्यता आहे.