Lok Sabha Election 2024: पंजाबपाठोपाठ आता दिल्लीतील 7 ही जागांवर निवडणूक लढवण्याची अरविंद केजरीवाल यांची घोषणा
Arvind Kejriwal | PTI

लोकसभा निवडणुकीपूर्वी (Loksabha Election) INDIA आघाडीला पुन्हा एकदा मोठा धक्का बसला आहे. आम आदमी पार्टीचे (AAP) राष्ट्रीय संयोजक आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांनी आम आदमी पार्टी (आप) पंजाबमधील (Punjab) सर्व 13 लोकसभा आणि चंदीगडच्या (Chandigadh) एका जागेवर निवडणूक लढवणार असल्याची घोषणा शनिवारी केल्यानंतर आता आज त्यांनी त्यांची पार्टी दिल्लीत (Delhi Lok Sabha Seat) देखील सर्व जागांवर आपला उम्मेदवार देणार असल्याची घोषणा केली आहे.  (हेही वाचा - Lok Sabha Elections 2024: पंजाब, चंदीगडमधील जागांबाबत अरविंद केजरीवालांची मोठी घोषणा, इंडिया आघाडीला धक्का)

दिल्लीत आम आदमी पक्षाला सातही जागा जिंकायच्या आहेत. पंजाबमध्ये लोकसभेच्या 13 पैकी 13 जागा जिंकून आम आदमी पक्षाला विजयी करा. मग केंद्र सरकारची हिंमत होणार नाही. दिल्लीतील सातही जागा आम आदमी पक्षाला दिल्या जातील, असे केजरीवाल जाबमधील तरनतारन येथील मेळाव्याला संबोधित करताना म्हटले होते. आता त्यांनी दिल्लीतील लोकसभेच्या सात जागांवर एकट्याने निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे.

आज भाजपला फक्त आम आदमी पक्षाची भीती वाटते. एका छोट्या पक्षाने दिल्लीत सरकार बनवले, पंजाबमध्ये सरकार बनवले आणि गोवा आणि गुजरातमध्येही आमदार निवडून आणले. एक दिवस आम आदमी पक्ष केंद्रात सरकार स्थापन करेल अशी भीती भाजपला वाटत असल्याचे अरविंद केजरीवाल यांनी म्हटले आहे. यामुळेच आम आदमी पक्षावर ते रोज आरोप करतात, कधी ईडी, कधी सीबीआय, असे वाटते की मी सर्वात मोठा दहशतवादी आहे.असे देखील त्यांनी म्हटले आहे.