Rahul Gandhi on Twitter: भारताच्या विनाशाचा मोहरा होऊ देऊ नका; राहुल गांधी यांचे ट्विटर सीईओ पराग अग्रवाल यांना पत्र
Rahul Gandhi | (Photo Credit - Twitter/ANI)

काँग्रेस (Congress) नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी ट्विटरचे सीईओ पराग अग्रवाल (Parag Agrawal) यांना पत्र लिहीले आहे. या पत्रात राहुल गांधी यांनी ट्विटरच्या माध्यमातून भारतातील अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर घातल्याजाणाऱ्या निर्बंधांवर भाष्य केले आहे. भारतातील अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर घातल्या जाणाऱ्या बंधनांचे ट्विटर अप्रत्यक्ष समर्थन करत असल्याचा राहुल गांधी यांचा ( Rahul Gandhi on Twitter) आरोप आहे. राहुल गांधी यांनी 27 डिसेंबर रोजी ट्विटरला पत्र लिहीले आहे. या पत्रात त्यांनी ट्विटर अकाऊंट डेटा विश्लेशणासोबतच पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि काँग्रेस नेता शशी थरुर यांच्याशी तुलना केली. यात राहुल गांधी यांनी म्हटले की, 2021 पूर्वी सात महिन्यांमध्ये त्यांच्या अकाउंटवर सरासरी 4 लाख फॉलोअर्स जोडले गेले. मात्र पाठिमागील वर्षी ऑगस्ट महिन्यात आढ दिवसांच्या निलंबनानंतर अनेक महिन्यांसाठी ही वाढ अचानक थांबविण्यात आली. इतर राजकीय नेत्यांच्या फॉलोअर्सची संख्या मात्र वाढत आहे.

राहुल गांधी यांनी म्हटले की, लोकांनी मला अत्यंत विश्वासाने आणि पूर्णपणे सद्सदविवेक बुद्धीने सांगितले आहे की, ट्विटर इंडियावर भारत सरकारचा दबाव आहे. माझा आवाज दडपण्यासाठी भारत सरकार ट्विटरवर दबाव टाकते आणि हा दबाव ट्विटर सहन करते. माझे ट्विटर अकाऊंटही काही दिवसांसाठी कोणत्याही कारणाशिवाय ब्लॉक करण्यात आले होते. सरकारसह इतर अनेक ट्विटर हँडलही अशी होती ज्यांनी मी केली तशाच पद्धतीची ट्विट केली होती. यातील कोणाचेही ट्विटर अकाऊंट ब्लॉक करण्यात आले नाही. ट्विटरने केवळ माझेच ट्विटर अकाऊंट ब्लॉक केले. (हेही वाचा, Rahul Gandhi on Hinduism and Hindutva: भारत हिंदुंचा देश, हिंदुत्ववाद्यांचा नाही, मी हिंदु आहे हिंदुत्त्ववादी नाही- राहुल गांधी)

राहुल गांधी यांनी पुढे म्हटले की, मी आफल्याला एक अब्ज पेक्षा अधिक भारतीयांच्या वतीने लिहीतो आहे की, ट्विटरला भारताच्या विचारांच्या नाशाचा मोहरा बनू देऊ नका. आलेल्या राहुल गांधी यांनी विचारलेल्या प्रश्न आणि पत्रांबद्दल 'द वॉल स्ट्रीट जर्नल' द्वारा ट्विटरला प्रश्न विचारण्यात आले. मात्र ट्विटरने कोणत्याही प्रकारची प्रतिक्रीया देणे टाळले. मात्र, ट्विटरच्या फॉलोअर्सच्या संख्येमध्ये चढ-उतार होत राहतात. कारण कंपनी स्पॅम आणि हेरफेर कमी करण्यासाठी मशीन लर्निंगचा उपयोग करते. नियमांचे उल्लंघन आणि ट्विटर नितीच्या बाहेर असलेली लाखो अकाऊंट्स ट्विटर हटवते.