Finger | (Photo credit: archived, edited, representative image)

Lok Sabha Election Results 2024: आपला नेता आणि पार्टी यांसाठी लोक वेडे असतात. अनेकदा याची प्रचिती आली आहे. हे लोक पक्ष, नेता यांच्यासाठी काहीही करु शकतात. छत्तीसगड (Chhattisgarh News) येथील बलरामपूर जिल्ह्यातील एका तरुणानेही असाच काहीसा प्रकार केला आहे. दुर्गेश पांडे असे नाव असलेल्या या 30 वर्षीय तरुणाने चक्क आपल्या हाताचे बोट कापून देवी कालीस अर्पण केले आहे. धक्कादायक म्हणजे राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) ची केंद्रामध्ये सत्ता आल्याबद्दल आणि आघाडीला बहुमत (NDA Victory) मिळाल्याबद्दल त्याने हा कारनामा केला आहे. पांडे हा कट्टर भाजप (BJP) समर्थक आहे. सार्वत्रिक निवडणुकीच्या मतमोजणीस सुरुवात झाल्यानंतर सुरुवातीचे काही काळ निकालादरम्यान काँग्रेस आणि INDIA आघाडीच्या बाजूने बहुमत दिसत होते. त्यामुळे पांडे प्रचंड नैराश्येत गेला. त्याने जवळच्या काली मंदिरात जाऊन भाजपच्या विजयासाठी प्रार्थना केली.

नवस पूर्ण करण्यासाठी कापले हातचे बोट

मतमोजणीदरम्यान दुपारनंतर कल बदलू लागले. नंतरच्या अपडेट्समध्ये भाजप सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास येत असल्याचे दिसून आले आणि एनडीएने 272 जागांचा बहुमताचा आकडा मागे टाकला, तेव्हा पांडे खूश झाला. अत्यंत भक्तीभावाने, तो काली मंदिरात परतला, त्याच्या डाव्या हाताचे एक बोट तोडले आणि ते देवीला अर्पण केले. दरम्यान, बोट कापल्याने मोठ्या प्रमाणावर रक्तस्त्राव झाला. त्याने हाताला कापड बांधून रक्तस्त्राव थांबविण्याचा प्रयत्न केला. रस्तस्त्राव थांबला नाही. रक्तबंबाळ अवस्थेत घरी आलेल्या दुर्गेशला पाहून कुटुंबीय घाबरले. त्यांनी त्याला नजीकच्या रुग्णालयात नेले. वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी आपत्कालीन प्राथमिक उपचार केले आणि त्यानंतर त्यांच्या दुखापतीची तीव्रता लक्षात घेऊन त्यांना अंबिकापूर वैद्यकीय महाविद्यालयात पाठवले. (हेही वाचा, Tongue Surgery Instead of Fingers: बोटांवरील उपचारांसाठी जिभेवर शस्त्रक्रिया; कोझिकोड मेडिकल कॉलेज हॉस्पिटलमध्ये वैद्यकीय निष्काळजीपणा, 4 वर्षांच्या मुलगी पीडिता)

काँग्रेसची आघाडी पाहून झाला व्यथित

वैद्यकीय महाविद्यालयातील डॉक्टरांनी शस्त्रक्रियेद्वारे रक्तस्त्राव थांबविण्यात यश मिळविले, परंतु उपचारास उशीर झाल्यामुळे ते कापलेले बोट पुन्हा जोडू शकले नाहीत. पांडे याची प्रकृती आता स्थिर आहे. एकूण प्रकाराबद्दल बोलताना पांडे याने सांगितले की, "सुरुवातीच्या ट्रेंडमध्ये काँग्रेस आघाडीवर असल्याचे पाहून मी व्यथित झालो. काँग्रेस समर्थक खूप उत्साहित झाले. मी माझ्या गावातील काली मंदिराला भेट दिली, ज्यावर संपूर्ण गावाची श्रद्धा आहे. माझीही त्यावर श्रद्धा होती आणि नवसही केला. दुपारनंततर आकडे बदलू लागले. भाजपला यश मिळाले. त्यामुळे आपण लगेच जाऊन नवस पूर्ण केला", असे पांडे यांनी स्पष्ट केले. (हेही वाचा, धक्कादायक! नवजात बाळाला 6-6 बोटं म्हणून नर्सने कापले एक-एक बोटं; बाळाचा मृत्यू)

दरम्यान, सार्वत्रिक निवडणूक अत्यंत अटीतटीची झाली. ज्यामध्ये टीडीपीचे एन चंद्राबाबू नायडू आणि जेडी(यू)चे नितीश कुमार यांसारख्या मित्रपक्षांच्या पाठिंब्याने एनडीएने 543 लोकसभेच्या 293 जागा मिळवल्या आणि युतीला बहुमताचा आकडा ओलांडण्यास मदत केली. विरोधी भारत गटाने जोरदार कामगिरी करत 234 जागा जिंकल्या. नरेंद्र मोदी रविवारी संध्याकाळी तिसऱ्यांदा पंतप्रधान म्हणून शपथ घेणार आहेत, ज्यात परदेशी नेत्यांची उपस्थिती अपेक्षित आहे.