
LPG Price Cut: तेल विपणन कंपन्यांनी महागाईपासून दिलासा देत एलपीजी सिलिंडरच्या किमती (LPG cylinder price) 17 रुपयांपर्यंत कमी केल्या आहेत. एलपीजी सिलिंडरच्या किमतीत झालेल्या या ताज्या कपातीनंतर, नवीन किमती आजपासून लागू झाल्या आहेत. कंपन्यांनी 19 किलोच्या व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या किमतीत (Commercial LPG cylinder price) ही कपात केली आहे. घरात वापरल्या जाणाऱ्या 14.2 किलोग्रॅमच्या घरगुती एलपीजी सिलिंडरच्या किमतीत कोणताही बदल झालेला नाही. कंपन्यांच्या या निर्णयामुळे सामान्य लोकांना कोणताही दिलासा मिळणार नाही. परंतु, या कपातीमुळे रेस्टॉरंट आणि हॉटेल मालकांना दिलासा मिळेल.
या वर्षी दिल्लीत व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या किमती या वर्षी 5 पैकी 4 वेळा कमी करण्यात आल्या आहेत, तर एकदा किंमत वाढवण्यात आली होती. 19 किलोच्या व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या किमतीत 1 जानेवारी रोजी 14.5 रुपये, 1 फेब्रुवारी रोजी 7 रुपये, 1 मार्च रोजी 6 रुपये आणि 1 एप्रिल रोजी 41 रुपयांची कपात करण्यात आली. (हेही वाचा - LPG Gas Cylinder Rates Revised: व्यावसायिक गॅस सिलेंडर 41 रूपयांनी स्वस्त; घरगुती गॅस सिलेंडरचे दर जैसे थे)
आज 1 मे रोजी त्यात 14.50 रुपयांची कपात करण्यात आली आहे. व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या किमतीत झालेल्या या कपातीनंतर, आजपासून देशातील प्रमुख शहरांमध्ये सिलिंडर स्वस्त होतील. व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या किमतींमध्ये आजच्या ताज्या सुधारणांनंतर, 19 किलोच्या एलपीजी सिलिंडरची किंमत दिल्लीत 1747.50, रुपये कोलकातामध्ये 1851.50 रु, मुंबईत 1699 आणि चेन्नईत 1906 रुपये असेल. (हेही वाचा - LPG Cylinder Price Hike: सर्वसामान्यांसाठी वाईट बातमी! एलपीजी सिलेंडरच्या किमतीत 50 रुपयांची वाढ)
तथापि, कोलकातामध्ये 19 किलोचा एलपीजी सिलेंडर जास्तीत जास्त 17 रुपयांनी स्वस्त झाला आहे. 14.2 किलोच्या घरगुती गॅस सिलेंडरबद्दल बोलायचे झाले तर, विनाअनुदानित सिलेंडरची किंमत दिल्लीत 853 रुपये, कोलकातामध्ये 879 रुपये, मुंबईत 852.50 रुपये आणि चेन्नईमध्ये 868.50 रुपये आहे.