LPG Cylinder Price Hike: सर्वसामान्यांना आता महागाईच्या झळा बसणार आहेत. केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी सोमवारी जाहीर केले की, उज्ज्वला (पीएमयूवाय) आणि उज्ज्वला नसलेल्या ग्राहकांसाठी एलपीजी सिलिंडरच्या किमतीत 50 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. पीएमयूवाय लाभार्थ्यांसाठी, किंमत 500 रुपयांवरून 550 रुपये प्रति सिलिंडरपर्यंत वाढेल. इतर ग्राहकांसाठी, ती 803 रुपयांवरून 853 रुपये पर्यंत वाढेल, असंही पुरी यांनी सांगितलं. त्यांनी पुढे सांगितले की ही वाढ नियतकालिक पुनरावलोकनाच्या अधीन आहे. पेट्रोल आणि डिझेलवरील अलिकडच्या उत्पादन शुल्कात वाढ करण्याचा उद्देश ग्राहकांवर भार टाकणे नाही तर अनुदानित गॅसच्या किमतींमुळे तेल विपणन कंपन्यांना झालेल्या 43,000 कोटी रुपयांच्या तोट्याची भरपाई करणे आहे, असे मंत्र्यांनी स्पष्ट केले.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)