Chandrayaan 2 Launch: राज ठाकरे, सचिन तेंडुलकर आणि शाहरुख खान कडून इस्त्रो शास्त्रज्ञांसाठी अभिनंदनपर ट्विट
Raj Thackeray and Sachin tendulkar (Photo Credits: PTI/TW/Getty)

भारतीय अंतराळ संशोधन केंद्राची (ISRO) चांद्रयान 2 (Chandrayaan 2) ने आज अवकाशात घेतलेले यशस्वी उड्डाण हे संपुर्ण भारतासाठी आणि प्रत्येक भारतवासियांसाठी अभिमानाची गोष्ट आहे. दुपारी 2.45 मिनिटांनी हे यशस्वी उड्डाण होताच सर्वच स्तरांतून इस्त्रोच्या शास्त्रज्ञांवर अभिनंदनाचा वर्षाव सुरु होण्यास सुरुवात झाली. हे लाइव्ह प्रक्षेपण पाहणे सर्व भारतीयांसाठी जणू ऐतिहासिक सोहळाच होता. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्विटरच्या माध्यमातून या शास्त्रज्ञांचे विशेष कौतुक केले. त्याचबरोबर क्रिडा, राजकीय आणि कला क्षेत्रातील ब-याच दिग्गजांनी सोशल मिडियाच्या माध्यमातून अभिनंदनपर पोस्ट करुन, ट्विट करुन कौतुक केले. यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray), अभिनेता शाहरुख खान (Shahrukh Khan), भारताचा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) ने ट्विटरच्या माध्यमातून इस्त्रोच्या शास्त्रज्ञांना विशेष शुभेच्छा दिल्या.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या मराठी शैलीत इस्त्रोचे अभिनंदन केले. पाहा ट्विट

तर मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकर याने ' या यशस्वी मोहिमेमुळे भविष्यात यांसारख्या अनेक महत्त्वाकांक्षी आणि यशस्वी मोहीम राबविल्या जातील अशी आशा करतो' असे म्हटले आहे. पाहा ट्विट

हेही वाचा- चांद्रयान-2 अवकाशात झेपावले, 'ISRO'च्या ऐतिहासिक कामगिरीचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून कौतुक

बॉलिवूड बादशहा शाहरुख खान ने ही आपल्या बॉलिवूड शैलीत इस्त्रो शास्त्रज्ञांचे अभिनंदन केले आहे. पाहा ट्विट

या चंद्र मोहिमेच्या मदतीने चंद्राच्या दक्षिण धुव्रावर संशोधन केले जाणार आहे. तेथील खनिजांचा अभ्यास करण्यासाठी ही मोहिम महत्त्वाची असल्याचं सांगण्यात आले आहे.इस्त्रोच्या संशोधकांनी केलेल्या दाव्यानुसार हे चांद्रयान 2 सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात चंद्रावर पोहचेल.