मध्य रेल्वेच्या (Central Railway) ठाणे (Thane) आणि दिवा (Diva) स्थानकादरम्यान लाईन नंबर 5 आणि 6 च्या कामासाठी पुन्हा 36 तासांचा मेगाब्लॉक (Mega Block) घेण्यात येणार आहे. शनिवार 8 जानेवारी दिवशी दुपारी 2 वाजल्यापासून रविवार 9 जानेवारी मध्यरात्री 2 वाजेपर्यंत हा ब्लॉक आहे. ब्लॉकच्या काळात कळवा, मुंब्रा, कोपर, ठाकुर्ली या स्थानकादरम्यान वाहतून बंद राहणार आहे. या दरम्यान प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून विशेष बस सेवा सुरू राहणार आहे.
मध्य रेल्वेकडून या ब्लॉकदरम्यान ठाणे ते विटावा रोड दरम्यान पुलाखाली नवीन टाकलेला रुळ कापून सध्याच्या डाउन आणि अप धीम्या मार्गांशी जोडला जाईल. त्याचप्रमाणे दोन रुळ एकमेकांना जेथे इंटरसेक्ट होतो तेथील क्रॉसओवर, यार्ड रीमॉर्डेंलगसह अन्य कामं ब्लॉक कालावधीत केली जाणार आहेत. नक्की वाचा: Rajesh Tope on Coronavirus and Mumbai Local: जिल्हाबंदी अथवा मुंबई लोकल बंद करण्याचा कोणताही विचार नाही- राजेश टोपे .
मध्य रेल्वे ट्वीट
दिनांक ०८.०१.२०२२ दुपारी ०२:०० वाजल्यापासून ते दिनांक १०.०१.२०२२ च्या मध्य रात्री ०२:०० वाजेपर्यंत अप आणि डाऊन धीम्या मार्गावर ३६ तासांचा पायाभूत सुविधा ब्लॉक pic.twitter.com/DBSnZnPHlF
— DRM MUMBAI CR (@drmmumbaicr) January 7, 2022
आज दुपारी 1 वाजल्यापासून 2 पर्यंत कल्याण स्थानकातून सुटणार्या अप धीम्या आणि सेमी फास्ट लोकल कल्याण ते माटुंगा दरम्यान ठाकुर्ली, कोपर, मुंब्रा, कळवा, नाहूर, कांजूर आणि विद्याविहार स्थानकांत थांबणार नाहीत. तर 2 नंतर अप धीम्या आणि सेमीफास्ट लोकल कल्याण आणि मुलुंड दरम्यान अप जलद मार्गावर वळवल्या जाणार आहेत. या लोकल ठाकुर्ली, कोपर, मुंब्रा आणि कळवा स्टेशन वर थांबणार नाहीत. तसेच आज 12.54 ते 1.52 दरम्यान दादर मधून सुटणार्या धीम्या आणि सेमी फास्ट लोकल मुलुंड आणि कल्याण स्टेशन दरम्यान डाऊन फास्ट मार्गावर वळवण्यात येणार आहेत. या लोकलला विद्याविहार, कांजूरमार्ग, नाहूर, कळवा, मुंब्रा, कोपर आणि ठाकुर्ली स्टेशन वर स्टॉप नसेल.