सरकारकडून मे-जून महिन्यासाठी पीएम गरीब कल्याण योजनेअंतर्गत मोफत धान्य देण्यास मंजूरी
PM Narendra Modi | (Photo Credits: Facebook)

केंद्र सरकारकडून  (Central Government) मे आणि जून 2021 साठी पंतप्रधान गरीब कल्याण योजने अंतर्गत मोफत धान्य देण्यासाठी मंजूरी दिली आहे. त्यानुसार मे आणि जून महिन्यात गरीबांना 5 किलो मोफत अन्नधान्य उपलब्ध करुन दिले जाणार आहे. जवळजवळ 80 कोटी लाभार्थ्यांना याचा फायदा होणार आहे. तर मोदी यांनी देशात कोरोनाच दुसरी लाट आली असून त्याच्याशी लढण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न केले जात आहेत. अशातच गरीबांना धान्य मोफत देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.(Home Quarantine असलेल्या Rahul Gandhi यांचा मोदी सरकार वर ट्वीट करत निशाणा; 'देशाला खोटे उत्सव, पोकळ भाषण नव्हे 'समाधान' हवयं')

पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजनेवर 26 हजार कोटी रुपयांहून अधिक खर्च केला जाणार आहे. त्यानुसार 5 किलो धान्य, रेशन कार्डवर वर राहणाऱ्यांचा धान्य कोटा अतिरिक्त असणार आहे.(R-Surakshaa Vaccination Programme: रिलायंस 1मे पासून त्यांच्या कर्मचारी व कुटुंबियांसाठी राबवणार स्वतंत्र लसीकरण मोहिम)

Tweet:

गेल्या वर्षात कोविड19 मुळे मार्च महिन्यात जेव्हा देशात संपूर्ण लॉकडाऊन लागू केला होता तेव्हा या योजनेची घोषणा केली होती. तर ही योजना पंतप्रधान गरीब कल्याण योजनेचा एक हिस्सा होता. त्यावेळी गरीबांच्या परिवाराला दिलासा देण्यासाठी पंतप्रधान गरीब कल्याण योजनेअंतर्गत सरकारने 80 कोटींहून अधिक रेशन कार्ड धारकांना एप्रिल, मे, जून 2020 साठी प्रति व्यक्ती पाच किलो धान्य आणि प्रति परिवार एक किलो डाळ मोफत दिली जाणार असल्याची घोषणा केली होती.