CBI VS Mamta Banerjee: निवडणुकीसाठी आखलेली विचारपूर्वक खेळी,शिवसेनेचा नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा
शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे (फोटो सौजन्य- ट्वीटर)

CBI VS Mamta Bannerjee: पश्चिम बंगाल मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamta Banerjee) आणि सीबीआय (CBI) मध्ये जोरदार वाद सुरु आहेत. त्यावरुन आता शिवसेनेने (Shivsena) पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्यावर पुन्हा एकदा निशाणा साधला आहे.आगामी निवडणुकीसाठी मोदी सरकारची ही 'विचारपूर्वक आखलेली खेळी' असल्याचा आरोप केला आहे.

तर शिवसेने सामनाच्या अग्रलेखातून टीका करत असे म्हटले आहे की, कोलकाता येथे जे काही सुरु आहे त्यामुळे लोकशाही पद्धतीला धोका बसणार आहे. चिटफंड घोटाळ्या प्रकरणी कोलकाता पोलीस प्रमुखांची चौकशी करण्यासाठी सीबीआयने केलेल्या प्रयत्नामुळे रविवारी धरणे आंदोलनासाठी ममता बॅनर्जी बसल्या आहेत. तसेच ममता बॅनर्जी यांचे असे म्हणणे आहे की, संविधान आणि देशाचे रक्षण करण्यासाठी हे आंदोलन सुरुच राहणार आहे. त्यासाठी ममता बॅनर्जी कोणतेही परिणाम सहन करण्यासाठी तयार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. (हेही वाचा-एकेकाळचा भाजपचा चाणक्य ठरवणार शिवसेनेची रणनिती?)

शिवसेनेने अग्रलेखातून असे म्हटले आहे की, कोलकाताचे पोलीस प्रमुखांविरुद्ध दोन महिन्यांपूर्वी कारवाई करु शकली असती. तसेच सीबीआयने त्यांच्या घरी जाण्यापूर्वी समन्स पाठवणे आवश्यक होते. तसेच शारदा चिट फंड घोटाळय़ातील आरोपीना सोडता कामा नये, पण गेल्या चार वर्षांत देशात घडलेल्या ‘चिट इंडिया’ प्रकरणाकडे सीबीआयचा अर्धमेला पोपट कोणत्या नजरेने पाहत आहे अशा पद्धतीची टीकेची झोड उठविण्यात आली आहे.