By-elections Results 2020: मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, कर्नाटक, गुजरात अनेक राज्यांत भाजप विजयी; काँग्रेस पक्षासह विरोधकांचा पराभव
By-elections Results 2020 | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

देशभरातील विविध राज्यांमध्ये होत असलेल्या पोटनिवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्ष (BJP) पुन्हा एकदा चांगले यश मिळवताना दिसत आहे. दुसऱ्या बाजूला काँग्रेस (Congress Party) आणि इतर विरोधी पक्षांना मात्र मोठा झटका बसला आहे. मध्य प्रदेश (Madhya Pradesh), उत्तर प्रदेश (Uttar Pradesh), कर्नाटक (Karnataka), गुजरात (Gujarat) यांसह इतरही काही राज्यांमध्ये पोटनिवडणुका पार पडत आहेत. या पोटनिवडणुकीत अनेक ठिकाणी भाजप मोठ्या प्रमाणावर विजयी होताना दिसत आहे. काही ठिकाणी काँग्रेस आणि विरोधी पक्षांनाही चांगले यश मिळताना दिसत आहे. परंतू, भाजपच्या विजयाचा आकडा तुलनेत मोठा आहे.

मध्य प्रदेशमध्ये विधानसभेच्या एकूण 28 जागांसाठी पोटनिवडणूक होत आहे. या ठिकाणी 21 ठिकाणी भाजप आघाडीवर आहे. तर काँग्रेस 7 आणि बसप एका ठिकाणी आघाडीवर आहे. (हेही वाचा, Bihar Assembly Election 2020: बिहार विधानसभा निवडणुकीत शिवसेनेला धक्का; 22 उमेदवारांना ‘नोटा’पेक्षाही कमी मते)

कर्नाटक

कर्नाटकमध्ये दोन्ही जागा भाजपने जिंकल्या आहेत.

उत्तर प्रदेश

उत्तर प्रदेशमध्ये भाजप, सपा यांना प्रत्येकी एक जागा मिळाली आहे.

गुजरात

गुजरातमध्ये एकूण 8 जागांपैकी 3 जागा भाजपने जिंकल्या आहेत. उर्वरीत जागांवर आघाडीवर आहे.

दरम्यान, बिहार विधानसभा निवडुकीसाठी झालेल्या मतदानाची मतमोजणी सुरु आहे. महागठबंधन आणि एनडीएमध्ये काट्याची टक्कर सुरु आहे. निकाल अद्यापही स्पष्ट झाले नाहीत. आघाडी-पिछाडी सुरुच आहे. त्यामुळे बिहारच्या जनतेच्या मनात नेमके काय आहे, हे अद्याप तरी कळायला मार्ग नाही. संपूर्ण निकाल हाती येण्यासाठी काही काळ वाट पाहावी लागणार आहे.