बिहार विधानसभा निवडणूक 2020 च्या (Bihar Assembly Election 2020) 243 जागांवरील मतमोजणी सुरू आहे. आतापर्यंत सर्व जागांवर सुरुवातीचा ट्रेंड समोर आला आहे. या ट्रेंडने एक्झिट पोलद्वारे केलेली भविष्यवाणी हादरली आहे. निवडणूक आयोगाच्या ट्रेंडनुसार राज्यात पुन्हा एकदा एनडीए (NDA) आघाडीचे सरकार दिसत आहे. मात्र, महागठबंधन आणि एनडीए (भाजप आणि जेडीयू) यांच्यात काट्याची स्पर्धा दिसून येत आहे. या निवडणुकीत शिवसेनेची (Shiv Sena) स्थिती अतिशय वाईट दिसत आहे. आतापर्यंत मोजलेल्या मतांनुसार शिवसेनेची कामगिरी नोटा (NOTA) पेक्षा वाईट आहे.
पहिल्यांदा बिहारमध्ये शिवसेना 50 जागांवर लढणार असल्याचं जाहीर केले. परंतु शिवसेनेने 22 जागांवर उमेदवार उभे केले होते, मात्र यातील सर्व 22 जागांवर शिवसेनेला ‘नोटा’पेक्षाही कमी मतदान झाले आहे. (हेही वाचा: बिहार निवडणूक निकालावर संंजय राऊत यांची प्रतिक्रिया- 'नीतीश कुमार मुख्यमंत्री झालात तर शिवसेनेचे आभार मानले पाहिजेत'; तेजस्वी मॅन ऑफ द मॅच)
पहिला टप्पा -
पालीगंज - मनीष कुमार - 107 मते
गया शहर - ब्युटी सिन्हा - 145 मते
वजीरगंज - मृत्युंजय कुमार – 68 मते
दुसरा टप्पा -
चिरैय्या - संजय कुमार - 305 मते
बेनीपूर - संजय कुमार झा – 754 मते
तरैय्या - रंजय कुमार सिंह – 378 मते
अस्थवां - विनिता कुमारी – 108 मते
मनेर - रवींद्र कुमार - 141 मते
राघोपुर - जयमाला देवी – 122 मते
भोरे - विनोद बैठा - 696 मते
मधुबनी - शंकर महसेठ - 322 मते
तिसरा टप्पा -
औराई - प्रदीप कुमार सिंह – 331 मते
कल्याणपुर - शत्रूघन पासवान – 1031 मते
बनमंखी - सुभाषचंद्र पासवान 131 मते
ठाकूरगंज - नवीन कुमार मल्लीक - 707 मते
समस्तीपुर - कुंदन कुमार – 46 मते
पुष्पांकुमारी - सराय रंजन – 269 मते
मोरवा - मनीष कुमार - 210 मते
किशनगंज - शिवनाथ मल्लीक - 201 मते
बहादुरगंज - चंदन कु. यादव – 1166 मते
नरपरगंज - गुंजा देवी – 125 मते
मनिहारी - नागेंद्र चंद्र मंडल – 496 मते
दरम्यान, बिहार विधानसभा निवडणुकीच्या सुरुवातीच्या ट्रेंडनंतर परिस्थिती पूर्णपणे बदलली आहे आणि एनडीएने चांगली आघाडी घेतली आहे. सध्या आरजेडीच्या नेतृत्वात महायुती 105 जागांवर आघाडीवर आहे तर एनडीए 127 जागांवर आघाडीवर आहे. त्याचबरोबर निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या आकडेवारीत एनडीए पुढे जात आहे.