Bihar Election Results 2020: बिहार निवडणूक निकालावर संंजय राऊत यांची प्रतिक्रिया- 'नीतीश कुमार मुख्यमंत्री झालात तर शिवसेनेचे आभार  मानले पाहिजेत'; तेजस्वी मॅन ऑफ द मॅच
Sanjay Raut| Photo Credits: Twitter/ ANI

बिहार निवडणूकीच्या मतमोजणीला सुरूवात झाली आहे. दरम्यान यंदा कोरोना संकटात मतदान झाल्याने मतमोजणीला पोलिंग बुथ वाढवण्यात आले होते. परिणामी मतमोजणीसाठी अधिक वेळ लागणार आहे. पण 3 वाजेपर्यंत 44% मतामोजणीनुसार, एनडीच्या बाजूने मतदारांचा कौल असल्याचं चित्र आहे. यावर आता महाराष्ट्रातून शिवसेना मुख्य प्रवक्ते संजय राऊत यांनी आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे. संजय राऊत यांनी आज पुन्हा आरजेडी नेता तेजस्वी यादवंचं भरभरून कौतुक केलं आहे. त्यांनी तेजस्वीला बिहार निवडणूकीमध्ये तो 'मॅन ऑफ द मॅच' ठरल्याचं म्हटलं आहे. 31 वर्षांचा उमदा तरूण निवडणूकीच्या रिंगणात उतरला. कोणाचही पाठबळ नसताना त्यांनी लाखोंच्या प्रचारसभा घेण्याचं कसब दाखवलं. त्याच्यामुळे विरोधकांनाही घाम फुटल्याचं त्यांनी म्हणत तेजस्वीच्या रूपाने बिहारला एक विश्वासू चेहरा मिळाला असल्याचं म्हणत तोंडभरून कौतुक केले आहे.

यंदा महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बिहार मध्ये भाजपा प्रभारी होते. यंदाच्या निवडणूकीमध्ये भाजपा पहिल्या क्रमांकाचा पक्ष आहे. कल पाहता त्यांच्याकडे सर्वाधिक आघाडी आहे. त्यामुळे या यशाबद्दल खुल्या मनाने देवेंद्र फडणवीसांचं कौतुक असल्याचेही त्यांनी म्हटलं आहे.

दरम्यान आज संजय राऊत यांनी तेजस्वी आणि देवेंद्र फडणवीस यांच्या कौतुकासोबत जेडीयूला आत्मचिंतन करण्याचा देखील सल्ला दिला आहे. भाजप, आरजेडीनंतर बिहारमध्ये जेडीयू तिसर्‍या क्रमांकावर घसरला आहे. तसेच आता सत्ता स्थापनेमध्ये जर भाजपाने नीतीश कुमारांनाच पुन्हा मुख्यमंत्री पद दिले त्यांनी शिवसेनेचे आभार मानावेत असं म्हणत भाजपाला देखील चिमटा काढला आहे. दरम्यान भाजपाने महाराष्ट्रात शिवसेनेसोबत जो खेळ विधानसभा निवडणूकीमध्ये खेळला आहे तो सार्‍यांनी बघितला आहे. त्यामुळे आता राजकारणात नैतिकता वगैरे काही उरली नसल्याचं सांगत जेडीयूनेच आत्मचिंतन करून बघावं असा सल्ला दिला आहे. Bihar Election 2020 Results: नीतीश कुमार यांनी बिहारच्या CM पदाचा दावा सोडल्यास BJP मधील 'हे' नेते ठरू शकतात मुख्यमंत्री पदाचे दावेदार.

दरम्यान बिहारमध्ये अजूनही मतमोजणीची प्रक्रिया धीम्या गतीने सुरू आहे. निवडणूक आयोगाने सांगितल्याप्रमाणे रात्री उशिरापर्यंत हे काम सुरू राहणार आहे. त्यामुळे 243 विधानसभा जागांचं चित्र स्पष्ट होण्यास थोडी अधिक प्रतिक्षा यंदा करावी लागणार आहे.