Union Budget 2020: देशाच्या आर्थिक घडामोडींसाठी महत्त्वाचा समजला जाणारा केंद्रीय अर्थसंकल्प आज संसदेत सादर केला जाणार आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman) आज पहिला अर्थसंकल्प सादर करतील. देशातील आलेली आर्थिक मंत्री आणि एकूणच आर्थिक अवस्था पाहता सर्वांचे या अर्थसंकल्पाकडे विशेष लक्ष आहे. यंदाच्या अर्थसंकल्पात वैयक्तिक प्राप्तीकरात कपात, ग्रामीण आणि कृषी क्षेत्रासाठी काय सवलती देण्यात येतील याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आज सकाळी 11 वाजता केंद्रीय अर्थसंकल्प मांडण्यास सुरुवात केली जाईल. अर्थशास्त्रज्ञांचे मत आहे की 2020 बजेट विशेष करून मंद अर्थव्यवस्थेला चालना देण्यावर केंद्रित असेल.
करदाता, कॉर्पोरेट्स, कर तज्ज्ञ, प्रत्येकाला अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्याकडून अनेक अपेक्षा आहेत. तथापि, मंदावलेली भारताची अर्थव्यवस्था कशी सुरळीत करता येईल याकडे मोदी सरकारसमोर या अर्थसंकल्पात मुख्य आव्हान असणार आहे.
या अर्थसंकल्पाचे लाईव्ह स्ट्रीमिंग पाहण्यासाठी येथे क्लिक करा
पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेच्या अंतर्गत शेतकर्यांना मदत वाढवून दिली जाऊ शकते. सध्या 6 हजार रूपये मिळणारी मदत वाढवून 8 हजार केली जाऊ शकते. अलीकडेच महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांना दोन लाख रुपये पर्यंतची कर्जमाफी जाहीर केली होती त्यात असे गिफ्ट मिळाल्यास शेतकऱ्यांना सुगीचे दिवस येऊ शकतील.
शिक्षण व्याजदरात सवलती देण्यापासून ते कला कौशल्याला वाव देणाऱ्या अभ्यास क्रमांच्या निमिर्तीसाठी विद्यापीठांना अनुदान देण्यापर्यंत अनेक निर्णय होण्याची अपेक्षा आहे. महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये काही तरतुदी होऊ शकतात. नोकरदार स्त्री वर्गाला मुलांच्या पाळणाघराच्या फीवर कर सवलत मिळण्याची शक्यता आहे. तसेच इनकम टॅक्स मध्ये सुद्धा सवलती दिल्या जाऊ शकतात.
थोडक्यात आजचा दिवस भारतासाठी आणि भारतीयांसाठी महत्वपूर्ण असणार आहे. आजच्या अर्थसंकल्पावर भारताचे भवितव्य अवलंबून असणार आहे.