Bogibeel Bridge: नरेंद्र मोदींच्या हस्ते लोकार्पण होणार, भारतातल्या सर्वात लांब डबल डेकर रेल-रोड ब्रिज बद्द्ल 10 खास गोष्टी
double decker bridge Bogibeel (Photo Credits: PTI)

Bogibeel Bridge: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज ( 25 डिसेंबर ) भारतातील सर्वात जास्त लांबीच्या रेल - रोड बोगीबील ब्रिज (Bogibeel Bridge) पुलाचं अनावरण करणार आहेत. ब्रम्हपुत्रा नदीवर Bogibeel Bridge  बांधण्यात आला आहे. 4.94 किमी लांबीच्या या ब्रिजचं भारत -चीन सुरक्षेच्या दृष्टीने देखील विशेष महत्त्व आहे. हा पूल ब्रह्मपुत्रा (Brahmaputra) नदीवर बांधण्यात आला असून आसाम राज्यातील दिब्रुगड (Dibrugarh) शहरात आहे. या पुलामुळे Dibrugarh University, Medical College मध्ये जाणं स्थानिकांना सुकर होणार आहे. सध्या येथील नागरिक बोटीच्या मदतीने हा रस्ता पार करत होते.

Bogibeel Bridge बद्दल काही महत्त्वाच्या गोष्टी -

  • Bogibeel Bridge चं भूमिपूजन माजी पंतप्रधान एच. डी. देविगौडा (H D Deve Gouda) यांच्या हस्ते 22 जानेवारी 1997 रोजी झाले होते. या पुलाच्या कामला सुरुवात अटल बिहारी यांच्या सरकारच्या काळात म्हणजे 21एप्रिल 2002 रोजी झाले.
  • पूल बांधण्यासाठी एकूण 5,960 कोटी खर्च करण्यात आला. या पुलाच्या बांधणीच्या कामात उशीर झाल्याने बजेट 85% वाढले. अन्यथा या पुलाच्या कामासाठी 3,230.02 कोटी खर्च अपेक्षित होता.
  • पुलाची मूळ लांबी 4.31 किमी होती मात्र नंतर तो वाढवून 4.94 किमी लांबीचा करण्यात आला.
  • अरुणाचल प्रदेश भागामध्ये चीनच्या सीमेलगत हा पूल फार महत्त्वाचा ठरणार आहे. या पुलावर उतरण्यासाठी Indian Air Force साठी ३ खास जागा आहेत. fighter jets देखील या पुलावर उतरू शकतात.
  • दिब्रुगड (Dibrugarh) पासून Rangiya पर्यंतचा प्रवास या पुलामुळे 170 किमीने कमी झाला आहे. आसाम आणि अरुणाचल प्रदेश या भागामध्ये या पुलामुळे आता सामाजिक आणि आर्थिक विकास होण्यास मदत होणार आहे.
  • (Dibrugarh) ते इटानगर (Itanagar) हा प्रवास देखील या पुलामुळे 150 किमी कमी होणार आहे. रेल्वेने देखील आता हा प्रवास 705 किमी कमी होणार आहे.
  • 120वर्ष हा ब्रीज सेवा देऊ शकतो अशाप्रकारे बांधण्यात आला आहे.
  • या पुलावर रेल्वे ट्रॅकच्या दोन लाईन आहेत. रेल्वे ट्रक खालच्या बाजूला आहेत तर वरच्या बाजूला रोडच्या तीन लाईन्स आहेत.
  • Northeast Frontier Railway (NFR) प्रमुख प्रणव ज्योती शर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार, या पुलाच्या बांधणीसाठी 30 लाख पोती सिमेंट, 19,250 mt reinforcement steel आणि 2,800 mt structural steel इत्तर साहित्यांसोबत वापरण्यात आला.
  • मुख्य पुलाची बांधणी करण्यासाठी एकूण 77,000 mt steel वापरण्यात आलं आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज अटल बिहारी वाजपेयी यांच्या जन्मदिवसाचं औचित्य साधून त्याच लोकार्पण करणार आहे. अटल बिहारी वाजपेयी यांचा जन्मदिवस म्हणून साजरा केला जातो.