Bengaluru Robbery: विचित्र चोरी; 89,000 रुपयांचे गुलाबजाम, रसगुल्ला आणि खाद्य तेल लंपास; बेंगळुरु येथील हॉटेलध्ये चोरट्यांचा प्रताप
Gulab Jamun, Rasgulla | Representative Image (Photo Credits: Pixabay)

कर्नाटक राज्यातील बंगळुरु (Bangalore) शहरात चोरट्यांनी एक विचित्रच चोरी केली आहे. या शहरातील एका प्रसिद्ध हॉटेलमधून चोरट्यांनी चक्क गुलाबजाम (Gulab Jamun), रसगुल्ला (Rasgulla) आणि खाद्यतेल (Cooking Oil) लंपास केले आहे. या सर्व मुद्देमालाची एकूण किंमत 89,000 रुपये इतकी आहे. काही उपोद्यापी लोकांनी हॉटेलच्या खिडकीची काच फोडून हॉटेलमध्ये प्रवेश केला आणि काही खाद्यपदार्थ चोरुन नेले. या वेळी चोरट्यांनी हॉटेलमधील खाद्यपदार्थांसोबतच आवश्यक कच्चा माल आणि किराणा सामनाचीही नासधूस केली. तसेच, हॉटेलचे नुकसानही केले.

टाईम्स ऑफ इंडीयाने दिलेल्या वृत्तानुसार, हॉटेलचे व्यवस्थापक संतानू मोंडल यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली. हॉटेलमध्ये चोरीची घटना घडल्यानंतर जवळपास 3 दिसांनी व्यवस्थापकाने पोलितात तक्रार दिल्याचेही या वृत्तात म्हटले आहे. रेस्टॉरंट लुटल्याची माहिती मिळताच चार दिवसांनी मँडल यांनी 28 मे रोजी मायको लेआऊट पोलिसात तक्रार दिली. अ‍ॅब्सोल्यूट बार्बेक असे या हॉटेलचे नाव असल्याचे समजते. (हेही वाचा, उमेदवाराला रसगुल्ला भारी पडला, पोलिसांनी थेट कायदा दाखवला)

हॉटेल व्यवस्थापकाने पोलिसांत दिलेल्या तक्रीरत म्हटले की, कर्नाटकमध्ये सध्या राज्यव्यापी लॉकडाऊन आहे. त्यामुळे 24 एप्रिलपासून रेस्टॉरंट बंद आहे. आम्ही नियमीत तपासणीसाठी जेव्हा रेस्टॉरंटमध्ये गेलो तेव्हा आमच्या लक्षात आले की, हॉटेलमध्ये चोरी झाली आहे. चोरट्यांनी खिडकीची काच फोडून हॉटेलमध्ये प्रवेश केला. त्यासोबतच भटारखान्यातील किराणा सामान, खाद्यतेल तसेच गुलाबजाम, रसगुल्ले लंपास केले आहेत. हॉटेलमध्ये नेहमीच मोठ्या प्रमाणावर खाद्यपदार्थ आणि किराणा सामनासोबत जीवनावश्यक वस्तुंचा साठा असल्याचे हॉटेल व्यवस्थापकाने तक्रारीत म्हटले आहे.