Bird Flu: केरळ मधील अलपुझ्झा जिल्ह्यात बर्ड फ्लूची प्रकरणे समोर आल्यानंतर प्रशासन सतर्क झाले आहे. शुक्रवारी जिल्ह्यातील थाकझी ग्राम पंचायतीत एकूण 12 हजार बदकांची हत्या करण्यात आली. बर्ड फ्लू ची प्रकरणे समोर आल्यानंतर त्याचे नमूने भोपाळ येथे चाचणीसाठी पाठण्यात आले आहेत. संक्रमण अन्य ठिकाणी पसरु नये म्हणून त्याच्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी अलप्पुझा मध्ये जिल्हाधिकाऱ्यांनी शुक्रवारी एक आपत्कालीन बैठक सुद्धा बोलावली होती.
जिल्ह्यातील थाकझी ग्राम पंचायतीच्या वॉर्ड क्रमांक 10 मध्ये बर्ड फ्लूची प्रकरणे समोर आली आहेत. संक्रमण समोर आल्यानंतर त्या परिसराला कंटेनमेंट झोन म्हणून घोषित करण्यात आले आहे. त्याचसोबत लोकांना आणि वाहनांच्या येण्याजाण्यावर बंदी घालण्यात आली आहे. स्थानिक प्रशासनाने परिसरात बदक, चिकन, लहान पक्ष्यांचे मासं आणि अंड्यांच्या विक्रीवर बंदी घातली आहे.(Corona Vaccination: बिहारमध्ये कोरोना लसीकरणाचा अजब प्रकार उघडकिस, चक्क मरण पावलेल्या महिलेला दिला कोरोना लसीचा दुसरा डोस)
बैठकीत असा ही निर्णय घेण्यात आला की, थकाझी पंचायतीच्या वॉर्ड क्रमांक 10 च्या एक किलोमीटरमध्ये येणाऱ्या पक्ष्यांना मारुन त्यांना सुरक्षित ठिकाणी पुरावे. या कामात स्थानिक अधिकाऱ्यांना मदत मिळावी म्हणून पोलिसांना निर्देशन दिले गेले आहेत. पोलिसांनाही परिसरावर लक्ष ठेवण्यास सांगितले आहे. ज्या ठिकाणी बर्ड फ्लूचे रुग्ण आढळून आले आहेत, त्या ठिकाणी जलद प्रतिसाद दलाची पथके तैनात केली जातील आणि लोकांना पक्षी प्रतिबंधक औषधांचे वाटप केले जाईल.
दरम्यान, सहाय्यक वनसंरक्षकांना बाहेरील देशातून येणाऱ्या पक्ष्यांमधून बर्ड फ्लूची लागण झाली आहे का, याचा शोध घेण्यास सांगितले आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी पशुसंवर्धन विभागाला बर्ड फ्लूच्या प्रतिबंधासाठी कोणती पावले उचलली आहेत याचा दैनंदिन अहवाल देण्यास सांगितले आहे.