Nitesh Rane (फोटो सौजन्य - Facebook)

Religious Certification: मत्स्य आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणे (Nitesh Rane) यांनी राज्यातील मटण विक्रेत्यांसाठी मल्हार झटका प्रमाणपत्र(Malhar Certification) सुरु करण्याची घोषणा केल्यामुळे वाद निर्माण झाला आहे. राज्य सरकारचा हा एक नवीन उपक्रम आहे. ज्याचा उद्देश राज्यभरातील झटका मटण (Jhatka Mutton) दुकानांची नोंदणी करणे आहे. या योजनेअंतर्गत, MalharCertification.com द्वारे प्रमाणित मटण दुकाने 100% हिंदू-संचालित असतील आणि विशेषतः हिंदू ग्राहकांना सेवा पुरवतील, असा त्यामगचा हेतू असल्याचे मंत्री राणे यांनी म्हटले.

नितेश राणे या उपक्रमाबाबत बोलताना मंत्र्यांनी म्हटले आहे की, 'महाराष्ट्रातील हिंदू समुदायासाठी हे एक महत्त्वाचे पाऊल आहे. या उपक्रमाद्वारे, हिंदूंना पारंपारिक हिंदू पद्धतींचे पालन करणाऱ्या झटका मटण दुकानांमध्ये प्रवेश मिळेल,' असे राणे यांनी प्रमाणपत्र सादर करताना सांगितले.

मल्हार प्रमाणपत्र म्हणजे काय?

मल्हार प्रमाणन हे एक नवीनच सुरू झालेले झटका मांस पुरवठादार पडताळणी व्यासपीठ आहे. जे मांस हिंदू धार्मिक परंपरेनुसार मिळवले जाते आणि प्रक्रिया केले जाते याची खात्री करते. अधिकृत MalharCertification.com वेबसाइटनुसार, हे प्रमाणपत्र केवळ हिंदू खटिक समुदायातील विक्रेत्यांसाठी उपलब्ध आहे. (हेही वाचा, 'Malhar' Certification For Hindu-run Mutton Shops: 100% हिंदू खाटीकांकडून मांस विक्रीसाठी राज्य सरकारकडून 'मल्हार सर्टिफिकेशन'; पहा मंत्री नितेश राणे यांचे आवाहन)

वेबसाइटचा दावा आहे की झटका-प्रमाणित मांस खालील वैशिष्ट्यांनी युक्त आहे:

  1. ताजे आणि स्वच्छ
  2. लाळेपासून मुक्त
  3. इतर कोणत्याही प्राण्यांच्या मांसात मिसळले जात नाही

झटका विरुद्ध हलाल: प्रमुख फरक

हलाल प्रमाणनाचा पर्याय म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे, जो इस्लामिक आहार कायद्यांनुसार मांस प्रक्रिया केली जाते याची खात्री करण्यासाठी मोठ्या प्रमाणात वापरला जातो. हलाल पद्धतीच्या विपरीत, जिथे प्राण्यांची हळूहळू रक्तस्त्राव करून कत्तल केली जाते, झटका मांस एकाच फटक्याने प्राण्याला त्वरित मारून तयार केले जाते, ज्याचे समर्थकांचा असा युक्तिवाद आहे की ही एक अधिक मानवीय पद्धत आहे.

नितेश राणे यांचे हिंदूंना आवाहन

प्रमाणपत्र जारी करताना, नितेश राणे यांनी हिंदू ग्राहकांना फक्त मल्हार-प्रमाणित दुकानांमधून मांस खरेदी करण्याचे आवाहन केले. त्यांनी म्हटले आहे की,'हे मल्हार प्रमाणपत्र व्यापकपणे स्वीकारले पाहिजे. मी सर्व हिंदूंना मल्हार प्रमाणपत्र नसलेल्या दुकानांमधून मटण खरेदी करण्यापासून परावृत्त करण्याचे आवाहन करतो. जय श्री राम,' असे ते म्हणाले. मल्हार प्रमाणन उपक्रमामुळे मांस उद्योगात धार्मिक प्रमाणपत्राबाबत महाराष्ट्रात चर्चा सुरू होण्याची शक्यता आहे. दरम्यान, राज्य सरकारने व्यवसायात धर्म आणि जात पाहणे कितपत योग्य आहे, असा सवल करत अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे.