बिहार येथे आरोपींकडून वृद्धाची हत्या, मृतदेह जळत्या होळीत फेकला
प्रतिकात्मक फोटो (फोटो सौजन्य-फेसबुक)

होळीच्या निमित्ताने सर्वत्र आनंदाचे वातावरण होते. मात्र या सणाला गालबोट लागले असून बिहार (Bihar) येथे होळीच्या दिवशी आरोपींनी एका वृद्धाचा गळा आवळून त्याची हत्या केली. तसेच वृद्धाचा मृतदेह जळत्या होळीत फेकला असल्याचा प्रकार घडला आहे.

गया जिल्ह्यात होलिका दहनाचा कार्यक्रम झाल्यानंतर 60 वर्षीय कालो चौधरी नावाच्या वृद्धाची हत्या करण्यात आली आहे. तसेच हत्या केल्यानंतर मृतदेह योग्य ठिकाणी फेकण्याच्या नादात त्यांनी वृद्धाचा मृतदेह जळत्या होळीत फेकला. यानंतर आरोपींनी तेथून पळ काढला. मात्र गावातील लोकांनी याबद्दल पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी पोहचून चौधरी ह्यांचा अर्धमृतदेह होळीतून बाहेर काढला. तसेच शव पोलिसांनी शवविच्छेदनासाठी सरकारी रुग्णालयात पाठवण्यात आले आहे.

या प्रकरणी पोलिसांकडून अधिक तपास करत असल्याचे सांगितले आहे. मात्र आरोपींनी वृद्ध व्यक्तीची कोणत्या कारणामुळे हत्या केली आहे याबद्दल अद्याप समजलेले नाही. तसेच बिहार येथे अजून एका तरुणाची जुन्या वादातून हत्या करण्यात आली असल्याचे ही प्रकरण उघडकीस आले आहे.