महाराष्ट्रात बिहार येथून अल्पवयीन मुलांची तस्करी, RPF च्या कारवाईमुळे खुलासा
प्रतिकात्मक फोटो (फोटो सौजन्य-फेसबुक)

महाराष्ट्रात (Maharashtra) बिहार (Bhihar( येथून काही अल्पवयीन मुलांची तस्करी (Child Trafficking) केली जात असल्याची धक्कादायक बाब RPF च्या कारवाईत उघड झाली आहे. या सर्व मुलांना महाराष्ट्रात मजुरीसाठी आणले गेल्याची माहिती समोर आली आहे. एकूण 33 अल्पवयीन मुलांना महाराष्ट्रात आणल्याचे सांगितले जात आहे.

छत्तीसगड येथील राजनंदगाव रेल्वेस्थानकातून 7-13 वयोगटातील मुलांना महाराष्ट्रात नेण्यात येत असल्याचे घटना मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या गाडीत घडली आहे. गाडीमधील S-5 आणि S-7 या डब्यांमध्ये ही सर्व मुले असल्याची माहिती रेल्वे पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी शोधकार्य सुरु करत मुलांपर्यंत पोहचले.(आश्चर्यंम! वडिलांची पेंशन मिळावी म्हणून मुलाने बदलले आपले लिंग, मुलगी बनून रेल्वेकडे सादर केली याचिका)

तस्करी करण्यात येणारी सर्व मुलांना मदरशांमध्ये घेऊन जात असल्याची माहिती आरोपीने पोलिसांना दिली. त्याचसोबत मुलांबद्दल कोणतीच कागदपत्रे आरोपीकडे नव्हती. तर मुलांना नंदूरबार येथे नेण्यात येत असल्याचेही आरोपीने कबुल केले. या प्रकरणी तिघांना अटक केली असून सर्व मुलांना सुधारगृहात पाठवण्यात आले आहे. या घटनेचा अधिक तपास पोलिसांकडून केला जात असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.