आश्चर्यंम! वडिलांची पेंशन मिळावी म्हणून मुलाने बदलले आपले लिंग, मुलगी बनून रेल्वेकडे सादर केली याचिका
(Representational Image/ Photo credits: Wikimedia Commons)

चेन्नईस्थित (Chennai) दक्षिण रेल्वे (South Railway) समोर एक अनोखे प्रकरण आले आहे. हे प्रकरण इतके किचकट आहे की, ते सोडवण्यासाठी चक्क केंद्र सरकारला पत्र पाठवण्यात आले आहे. तर  हे प्रकरण रेल्वेतील एका कामगाराच्या पेंशनबाबत आहे. या पेंशनवर आपला हक्क सांगण्यासाठी या कामगाराच्या मुलाने वडिलांचा मृत्यू झाल्यानंतर, चक्क लिंग बदल शस्त्रकीया केली आहे. आता हा मुलगा मुलगी बनला आहे. रेल्वेच्या गेल्या 160 वर्षांमध्ये अशा प्रकारचा अजब प्रकार पहिल्यांदाच घडला आहे. आता ही पेंशन या नव्या मुलीला द्यावी की नाही याबाबत विचार सुरु आहे.

या महिलेचे वडील रिटायर्ड रेल्वे कर्मचारी होते, ज्यांचा 2017 मध्ये मृत्यू झाला होता. रेल्वेच्या नियमानुसार,  मृत रेल्वे कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना ही पेंशन दिली जाते. यामध्ये 25 वर्षांपेक्षा कमी वयाची मुले आणि अविवाहित मुलींचाही समावेश होतो. सरकारी कर्मचा-यांचा मृत्यु झाल्यानंतर त्यांच्या पत्नीला ही पेंशन दिली जाते. दक्षिण रेल्वे ऑफिसमध्ये 2018 मध्ये या महिलेने पत्र लिहून पेंशनची मागणी केली होती. मात्र हे प्रकरण फारच वेगळे असल्याने रेल्वेने कोणताही निर्णय घेतला नाही. हे पत्र रेल्वेने केंद्रीय कामगार, पेंशन आणि लोक तक्रार मंत्रालयाला पाठवले आहे. (हेही वाचा: लिंग बदल शस्त्रक्रिया करण्यास मुलाला वडीलांचा विरोध, तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या)

या महिलेने आपल्या याचिकामध्ये दावा केला आहे की, वडील जिवंत असल्यापासूनच तो महिलेचे जीवन जगत होता. तसेच अविवाहितही आहे त्यामुळे त्याला ही पेंशन मिळाली पाहिजे. केंद्र सरकारच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी चौकशी केली असता, 2009 मध्ये या व्यक्तिला तमिलनाडु ट्रान्झेंडर वेल्फेयर असोसिएशनकडून एक प्रमाणपत्र मिळाले असल्याचे दिसून आले. मात्र तृतीयपंथी व्यक्तिला पेंशन प्राप्त करण्याचा हक्क आहे की नाही याबाबत रेल्वेची द्विधा मनःस्थिती आहे.