चेन्नई: मनाली येथील एका युवकाला स्वत:वर लिंग बदल शस्त्रक्रिया (Penis Replacement Surgery) करायची होती. ही शस्त्रक्रिया किरून घेण्यास वडिलांनी त्याल स्पष्ट नकार दिला. वडिलांच्या निर्णयामुळे चिडलेल्या पार्थसारथी नावाच्या या 21 वर्षीय तरुणाने गळफास लाऊन घेत आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. सदर तरुणास लिंग बदलून मुलगी व्हायचे होते.
पोलिसांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तात प्रसारमाध्यमांनी म्हटले आहे की, पार्थसारथी हा गजेंद्रन यांचा मुलगा आहे. हे दोघेही विरुगमबक्कम येथील राहणारे आहेत. पार्थसारथी हा बीसीए पदविधर आहे. पदवी घेतल्यापासून तो बेरोजगार होता. तसेच, वडीलांनी अनेकदा सांगूनही तो नोकरी शोधत नव्हता. पोलिसांनी म्हटले आहे की, गेले काही दिवस पार्थसारथी याच्या वर्तनात बरेच बदल झाले होते.
गेल्या काही दिवसांपासून पार्थसारथी आपल्या मित्रांशीही बोलत नव्हता. तसेच, तो घरातच बसून असे. त्याने आपल्याला लिंग बदल करायचा आहे असा निर्णय घरच्यांना सांगितला होता. मात्र, त्याच्या घरच्यांनी त्यााल तीव्र विरोध दर्शवला होता. खास करुन त्याच्या वडीलांनी. गेले तीन दिवस तो घरातून बेपत्ता होता. एका वृद्ध महिलेच्या घरी तो आश्रीत म्हणून राहात होता. (हेही वाचा, वीणा सेंद्रे: मादक डोळे, गुलाबी हसू, रॅम्पवॉक करणाऱ्या ट्रान्सजेंडरची अनोखी कहाणी)
दरम्यान, गजेंद्रन यांनी पाहिले की, त्यांचा मुलगा हा मनाली येथील ट्रान्सजेंडर समूहासोबत राहतो आहे. त्यानंतर शुक्रवारी रात्री त्याचे वडील त्याला शोधत आले. मात्र, पार्थसारथीने घरी यायला विरोध केला. तुम्ही जर मला लिंग परिवर्तन करण्यास मान्यता देत असाल. तरच मी घरी येईन अन्यता नाही, असे त्याने वडीलांना सांगितले. त्यानंतर हताश मनाने वडील गजेंद्रन हे परत आपल्या घरी आले.
पोलिसांनी सांगितले की, गजेंद्रन यांनी आपल्या मुलाला सांगितले होते की, त्याला घ्यायला पुन्हा ते दोन दिवसांनी येतील. दरम्यान, पार्थसारथी याने आत्महत्या केली. मनाली पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून, तपास सुरु केला आहे. तसेच, पार्थसारथी याचे पार्थिव शवविच्छेदनासाठी पाठवले आहे.