Cyber-attack | Representational Image (Photo Credit: PTI)

Cyber Scam: महाराष्ट्र अंमली पदार्थ विभागातील (Maharashtra Narcotics Division) मोठा अधिकारी असल्याचे सांगत एका सायबर भामट्यांनी दिल्ली येथील डॉक्टरला गंडा घातला आहे. हा गंडा थोडाथोडका नव्हे तर तब्बल 4.47 कोटी रुपयांचा आहे. फसवणूक करणाऱ्या व्यक्तीने 34 वर्षीय महिला डॉक्टरला सांगितले की, तिच्याशी संबंधीत FedEx कुरिअरमध्ये मोठ्या प्रमाणात MDMA औषध सापडले आहे. त्यामुळे तुमच्यावर कारवाई करावी लागणार आहे. या कारवाईपासून वाचायचे असेल तर त्या बदल्यात तुम्हाला मोठ्या प्रमाणावर आर्थिक दंड द्यावा लागेल.

सायबर गुन्हेगारांनी संबंधित महिलेला दंडापोटी मोठी रक्कम टप्प्याटप्यात द्यावी असे सांगितले. त्यासाठी तिच्यावर दबाव टाकून ही रक्कम घेतली गेली. धक्कादायक म्हणजे आरोपींनी अंधेरी पोलिस स्टेशनचे आरबीआय अधिकारी, मुंबई पोलिसांचे डीसीपी, कस्टमचे गुप्तहेर आणि नार्कोटिक्स विभागाचे पोलिस अशा वेगवेगळ्या पदांवर कार्यरत असल्याचे सांगणाऱ्या तोतया लोकांना महिलेशी बोलायला लावले. महिलेकडून पैसे उकळण्यासाठी भामट्यांनी एक खोटे जाळेच तयार केले. (हेही वाचा, Mumbai Online Shopping Fraud: फक्त 660 रुपयांची कुर्ती पडली अडीच लाख रुपयांना; मुंबईतील तरुणीला ऑनलाईन शॉपींग महागात)

टाइम्स ऑफ इंडियाने प्रकाशित केलेल्या वृत्तानुसार दिल्ली पोलिसांनी फसवणूक करणाऱ्यांविरुद्ध महिला डॉक्टरच्या तक्रारीवरुन एफआयआर दाखल केला आणि या प्रकरणात तांत्रिक तपास सुरू केला. पोलिसांनी या सायबर घटनेचे वर्णन पाठिमागील काही काळातील सर्वात मोठी फसवणूक असे केले आहे. पीडितेने TOI ला माहिती देताना सांगितले की, कॉलरने दावा केला आहे की पार्सलमध्ये तिचा पासपोर्ट, दोन जोडे बूट, बँकिंग कागदपत्रे, कपडे आणि 140 ग्रॅम MDMA आहे. हे सर्व कारवाईदरम्यानस पकडण्यात आले आहे. पीडितेने तिच्यावरील आरोप नाकारले. त्यानंतर भामट्यांनी तिला अंधेरी पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवण्यास सांगितले. पीडित मुलगी दिल्लीत असल्याने पोलिसांनी तिला ऑनलाइन तक्रार दाखल करण्यास सांगितले. तिला स्काईप अॅप्लिकेशन डाउनलोड करण्यास सांगण्यात आले.

पीडितेने कथीतरित्या तक्रार दाखल करताच इन्स्पेक्टर पाटील असल्याचा दावा करणाऱ्या महिलेने स्काईपवर पीडितेशी संपर्क साधला आणि तिच्या आधार आयडीची पुष्टी करण्यासाठी इतर कोणाशी त्याचा गैरवापर न करण्याबाबत सांगितले. TOI च्या वृत्तानुसार, मुंबईत 23 बँक खाती उघडण्यासाठी तिच्या आयडीचा गैरवापर करण्यात आला. (हेही वाचा,Mumbai Online Shopping Fraud: फक्त 660 रुपयांची कुर्ती पडली अडीच लाख रुपयांना; मुंबईतील तरुणीला ऑनलाईन शॉपींग महागात )

यानंतर, तिला तिच्या बॅंक खात्यांचे बॅलन्ससह स्नॅपशॉट प्रदान करण्यास आणि तिचे संपूर्ण आर्थिक तपशील उघड करण्यास सांगितले गेले. आपण भामट्यांच्या जाळ्यात फसत आहोत याची यतकिंचीतही कल्पना पीडितेला आली नाही. तिने कॉलरच्या सूचनेनुसार कथीत संभाव्य जप्ती टाळण्यासाठी ठेवी आणि पडताळणीसाठी तिच्या मुदत ठेवी तोडल्या.

दुसर्‍या एका पोलिसाने तिला आरटीजीएस फॉर्म भरण्यास सांगितले. त्यानेआपण आरबीआय अधिकारी असल्याचा दावा केला. दुसऱ्याने तो मुंबई नार्कोटिक्स विभागाचा प्रमुख असल्याचे सांगिले. या सर्वांनी डॉक्टरला ₹4.47 कोटी लुटले.