H D Deve Gowda | (Photo Credits-Twitter)

BIG CLAIM: जेडीएस राष्ट्रीय अध्यक्ष एच. डी. देवेगौडा (H D Deve Gowda) यांनी एक गौप्यस्फोट करत खळबळ उडवून दिली आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी सोबत सत्ता स्थापन करण्यासाठी भारतीय जनता पक्षाने कुमारस्वामी (Persuade Kumaraswamy) यांना पैशांची ऑफर केली होती, असे देवेगौडा यांनी म्हटले आहे. मात्र, कुमारस्वामी यांनी ही ऑफर नाकारली. बोलणी करण्यासाठी त्यांना मुंबईलाही बोलविण्यात आले होते. तरीसुद्धा ते मुंबईला गेले नाहीत आणि भाजपची ऑफरही घेतली नाही, असे देवेगौडा यांनी म्हटले आहे.

लोकसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेस आमदारांचा एक गट भाजपच्या संपर्कात असल्याच्या बातम्या प्रसारमाध्यमातून झळकल्या होत्या. मात्र, हे आमदार प्रत्यक्षात उघडपणे भाजपच्या गोटात सामील होऊ शकले नाहीत. त्यामुळे कुमारस्वामी सरकार पडू शकले नाही. याच काळात कुमारस्वामी यांना पैशाची ऑफर देण्यात आली, असे देवेगौडा यांनी म्हटले आहे. (हेही वाचा, गुजरात: 10 रुपयांवरुन दिशाभूल करत 72 वर्षीय वृद्ध व्यक्तीचे 2 लाख रुपये लांबवले)

दरम्यान, भाजप आमदारांचा पाठींबा घ्या आणि सरकार स्थापन करा. त्यासाठी मोठ्या रकमेच्या स्वरुपात पैसेही घ्या असे भाजपकडून आलेल्या ऑफरचे स्वरुप होते. विशेष म्हणजे, या ऑफरसाठी ठेवण्यात आलेले पैसे मुंबईत आहेत. आपण, मुंबईला जा ते पैसे घ्या असेही भाजपकडून सांगण्यात आले होते. मात्र, कुमारस्वामी हे कोठेही गेले नाहीत. त्यांन पैसेही घेतले नाहीत आणि ऑफरही स्वीकारली नाही, असे देवेगौडा यांनी म्हटले आहे.