गुजरात (Gujarat) मधील अहमदाबाद (Ahmedabad) येथील गांधीनगर सेक्टर 7 मध्ये एका 72 वर्षीय वृद्ध व्यक्तीची दिशाभूल करत त्याचे 2 लाख रुपये लंपास केल्याची घटना समोर आली आहे. मंगळवारी (26 मार्च) दुपारच्या वेळेस ही घटना घडली. झहीरुद्दीन शेख असे या वृद्ध व्यक्तीचे नाव आहे. मुंबई: 2000 रुपयांच्या नोटा बघण्याच्या बहाण्याने ताज महल हॉटेलच्या कॅशिअरला चक्क 46 हजारांना गंडवलं
शेख बाईकवरुन जात असताना दोन व्यक्तींनी तुमची दहा रुपयांची नोट खाली पडली असल्याचे त्यांना सांगितले. ती नोट उचलण्यासाठी शेख गेले असताना त्या व्यक्तींनी 2 लाखांनी भरलेली त्यांची बॅग उचलून तिथून पोबारा केला. या प्रकरणी झहीरुद्दीन शेख यांनी सेक्टर 7 पोलिस स्थानकात एफआयआर दाखल केली आहे. गुजरात येथे मुकबधिर असल्याचे नाटक करत भामट्याने पळवले 40 लाख रुपयांचे हिरे
शेख यांनी सेक्टर 16 मध्ये असलेल्या बँकेतून दोन लाख रुपये काढले आणि ते सेक्टर 7 येथील आपल्या घराच्या दिशेने बाईकवरुन चालले होते. त्यावेळी त्यांची दिशाभूल करुन त्यांच्याजवळील पैसे लंपास करण्यात आले. या व्यक्ती बॅग पळवत असताना रस्त्यावरील लोकांनी आरडाओरड करण्यास सुरुवात केली. मात्र त्याचा काही उपयोग झाला नाही. या प्रकरणी पोलिस अधिक तपास करत आहेत.