भोपाळ: बायकोने दारु प्यावी म्हणून नवऱ्याची कोर्टात धाव
प्रतिकात्मक फोटो (Photo Credits: Facebook)

नवरा बायकोच्या नात्यात काहीना काही गोष्टींवरुन वाद होत असतात. मात्र जर नवऱ्याला वाईट व्यसनांची सवय असल्यास बायकांना त्यांचा अत्यंत राग येतो त्यावरुन सुद्धा नवरा बायकोत कडाक्याच्या भांडणाची स्थिती पाहायला मिळते. मात्र भोपाळ (Bhopal) येथे एका नवऱ्याने चक्क बायकोने दारु प्यावी म्हणून तिच्या विरोधात कोर्टात धाव घेतली आहे.

कोर्टात दाखल करण्यात आलेल्या या प्रकाराबद्दल सर्वत्र चर्चा होत आहे. तर दारु पिताना बायकोने आपल्याला साथ द्यावी अशी नवऱ्याची इच्छा आहे. तर नवरा हा एका मध्यवर्गीय घरातील आहे. त्याच्या घरातील बायको सोडून अन्य मंडळी दारु पितात. तसेच त्याचे नातेवाईकसुद्धा कौटुंबिक कार्यक्रमावेळी दारु पितात. मात्र बायको दारु पित नसल्याची तक्रार त्याने केली आहे. (आश्चर्यंम! वडिलांची पेंशन मिळावी म्हणून मुलाने बदलले आपले लिंग, मुलगी बनून रेल्वेकडे सादर केली याचिका)

लग्नाच्या काही दिवसानंतर या दोघांमध्ये वाद सुरु झाले. तर सासरच्या मंडळींनी महिलेवर दारु पिण्याची जबरदस्ती केली. तसेच आम्ही सगळेजण दारु पित असताना तु त्यामध्ये सहभागी हो असे सुद्धा तिला सांगण्यात आले. या कारणामुळे दोघांमध्ये बऱ्याच वेळा भांडणसुद्धा व्हायचे. त्यामुळे नवऱ्याने कौंटुंबिक कोर्टात धाव घेतली आहे.