
MP Shocker: मध्य प्रदेशातील उज्जैन (Ujjain) येथे दारूच्या नशेत एका वडिलांनी तरुण मुलाची हत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या प्रकरणात आरोपी वडिलांना आणि मुलाचे खून प्रकरणा दाबून ठेवल्या प्रकरणी आईला देखील पोलिसांनी अटक केले आहे. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. महाकाल पोलिसांनी बुधवारी तरुणाच्या हत्याकांडचे प्रकरण उघडकीस आणले आहे. आरोपी आई आणि वडिलांना न्यायालयीन कोठडीसाठी मध्यवर्ती भैरवगज कारागृहात पाठवण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, १ जानेवारीला सर्वत्र नवीन वर्षाच्या स्वागाताचे जल्लोष सुरु होते. दरम्यान उज्जैन येथील जयसिंगपूरा येथे राहणाऱ्या एका कुटुंबावर दुखाचे डोंगरच कोसळला. दारूच्या नशेत भांडणात वडिलांनी मुलाची हत्या केली. संजू असं या घटनेतील मृत तरुणाचे नाव आहे. संजू रात्री दारू पिऊन घरी आला, दारू पिऊन घरी आल्याने वडिलांनी संताप व्यक्त केला.दरम्यान संजूचे वडिल हे देखील मद्यधुंद अवस्थेत होते. दोघांमध्ये सुरुवातीला भरपूर वाद झाला. रागाच्या भरात संजूच्या वडिलांनी घरातून चाकू आणून त्याच्या पोटात भोकसला. या घटनेत संजू गंभीर झाला. संजूच्या पोटातून भरपूर रक्तस्त्रवा झाला. (हेही वाचा- पुण्यात कोयत्या गॅंगची दहशत, चिकन दिलं नाही म्हणून दुकानदाराला भोसकले)
आईने शेजारच्यांकडून बॅडेज आणले आणि त्याच्या जखमावर लावल्या. त्यानंतर बेडरुममध्ये त्याला झोपवले. सकाळी त्याने आईकडून पाणी मागितले आणि त्याचा त्रास वाढू लागला. त्यानंतर आई आणि भावाने त्याला रुग्णालयात नेलं. परंतु उशिर झाल्याने डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. मृतदेह घेऊन ते स्मशान भुमित पोहचत होते दरम्यान पोलिसांनी संजूचा मृतदेह ताब्यात घेतला. घरातल्यांशी चौकशी केल्यानंतर सर्व घटना उघडली. मुलाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकिय रुग्णालयात पाठवला. वडिलांवर पोलिसांनी खूनाचा गुन्हा दाखल करून घेतला तर हत्येचे प्रकरण दाबून ठेवण्याचा गुन्हा आईवर दाखल झाला.