Bhopal Hospital Fire: मध्य प्रदेशाची राजधानी भोपालच्या हमीदिया परिसरात सोमवारी रात्री मोठी दुर्घटना घडली आहे. येथे कमला नेहरु इमारतीच्या पीडियाट्रिक विभागात आग लागल्याची घटना घडली. या दुर्घटनेत 4 मुलांचा मृत्यू झाला आहे. एसएनसीयू मध्ये एकूण 40 मुले भरती करण्यात आली होती. त्यामधील 36 मुलांना दुसऱ्या वॉर्डात शिफ्ट करण्यात आले होते. दरम्यान, आग का लागली याचे कारण स्पष्ट झालेले नाही. तर मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान या प्रकरणाचा उच्च स्तरीय तपास करण्याचे आदेश दिले आहे. माजी पंतप्रधान कमलनाथ यांनी ही घटना अत्यंत दु:खद असल्याचे म्हटले आहे.
शिवराज सिंह चौहान यांनी या प्रकरणी दुख व्यक्त केले. तर आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले असल्याचे त्यांनी म्हटले आहे. तर याच्या उच्च स्तरीय तपासाचे आदेश ही दिले आहेत. त्यांनी असे म्हटले की, याचा तपास आरोग्य आणि वैद्यकिय विभागाचे एसीएस मोहम्मद सुलेमान करणार आहेत.(Spurious Liquor Case: गोपालगंज येथे विषारी दारु प्यायल्याने मृतांचा आकडा 8 वर पोहचला)
Tweet:
बच्चों का असमय दुनिया से जाना बेहद असहनीय पीड़ा है। ईश्वर से दिवंगत आत्माओं की शांति की प्रार्थना करता हूं। इन बच्चों के परिजनों के प्रति मेरी गहरी संवेदनाएं हैं। घटना में जो घायल हुए हैं, उन्हें शीघ्र स्वास्थ्य लाभ हो, यही मेरी कामना है।
।। ॐ शांति ।।
— Shivraj Singh Chouhan (@ChouhanShivraj) November 8, 2021
चिकित्सा शिक्षण मंत्री विश्वास सारंग यांनी ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागली असल्याचा संशय व्यक्त केला आहे. त्यांनी असे म्हटले की, वॉर्डाच्या आतमधील स्थिती अत्यंत भयानक होती. तर सीएम शिवराज यांनी मृत मुलांच्या परिवाराला 4-4 लाख रुपयांची आर्थिक मदत करण्याची घोषणा केली आहे.