Spurious Liquor Case: गोपालगंज येथे विषारी दारु प्यायल्याने मृतांचा आकडा 8 वर पोहचला
Death (Photo Credits-Facebook)

Spurious Liquor Case: गोपालगंज येथे विषारी दारु प्यायल्याने आणखी सहा जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे मृतांचा आकडा आता हा 8 वर पोहचला आहे. एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, चार जण दृष्टीहीन झाले असून अन्य काही जण गंभीर रुपात आजारी आहेत. पूर्व चंपारण जिल्ह्यातील मोतिहारीच्या रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. याच दरम्यान राज्याचे उत्खनन आणि भूविज्ञान मंत्री आणि गोपालगंजचे भाजप आमदार जनक राम यांनी पोटनिवडणुकीत नितीश कुमार यांच्या विजयाचा बदला घेण्यासाठी त्यांनी या शोकांतिकेला विरोधकांनी रचलेले 'षड्यंत्र' असे म्हटल्याने वादाला तोंड फुटले आहे.

त्यांनी असे म्हटले की, गोपालगंज मध्ये मृत्यू झालेली लोक ही दारिद्र रेषेखालील आहेत. ते नीतीश कुमार यांना बदनाम करण्यासाठी विरोध पक्षातील नेत्यांच्या कटाच्या कारणास्तव मारले गेले आहेत. जनक राम यांनी गुरुवारी असे म्हटले की, त्यांनी दिवाळी आणि छठ पूजा दरम्यान नागरिकांमध्ये द्वेष निर्माण करण्याचा कट रचला. राज्य सरकार आरोपींच्या विरोधात कठोर कारवाई करणार आहे. घटना मंगळवारी संध्याकाळी याच ठाणे परिसरातील मोहम्मदपुर गावातील आहे. गोपालगंज चे जिल्हाधिकारी डॉ. नवल किशोर चौधरी यांनी असे म्हटले की, रहस्यमय परिस्थितीत मृत्यू झाले आहेत. चौधरी यांनी म्हटले की, आम्ही पीडितांच्या घरातून नमूने एकत्रित केले आणि त्याचे परिक्षण करण्यासाठी फॉरेंसिक लॅबकडे पाठवले. आम्ही मृतांच्या छवविच्छेदनाच्या रिपोर्ट्सची वाट पाहत आहोत. या प्रकरणी चार जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. गोपालगंजचे एसडीपीओ संजीव कुमार आणि उत्पादन शुल्क अधीक्षक राकेश कुमार यांनी गावात छापेमारी केली.(Odisha Murder Case: भुवनेश्वरमध्ये व्यक्तीने पत्नी आणि नऊ वर्षांच्या मुलाची केली हत्या, आरोपीला अटक)

संजीव कुमार यांनी म्हटले की, अटक करण्यात आलेल्या व्यक्ती या दारुची विक्री करणाऱ्या रॅकेटमध्ये सहभागी आहे. मुख्य आरोपी छठू राम याने पळ काढला आहे. तर त्याचा साथीदार महेश राम याचा विषारी दारु पिऊन मृत्यू झाला आहे. आम्ही दारुची पाकिटे जप्त केली आहेच. त्याचसोबत त्यांची घर सील करणे ही सुरु केले आहे. मृत संतोष शहाची आई उमरावती देवी म्हणाली की, त्याने मंगळवारी संध्याकाळी मद्य प्राशन केले होते आणि तो आजारी पडला होता. आम्ही त्याला रुग्णालयात नेले, तेथे उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. छोटेलाल शाह, मुकेश राम, रामबाबू यादव, चुन्नू पांडे, योगेंद्र राम, मेवालाल शाह आणि आणखी एक अशी अन्य मृतांची नावे आहेत.