पेट्रोल पंपावर (Petrol Pump) ईव्ही चार्जिंग स्टेशन (EV Charging Station) उभारण्याची देशातील प्रमुख पेट्रोलियम कंपनी भारत पेट्रोलियमची (Bharat Petroleum) योजना आहे. यासाठी कंपनी तब्बल 1 लाख कोटींची गुंतवणूक करणार आहे. इलेक्ट्रिक वाहनांसाठी (Electric Vehicles) चार्जिंग इन्फ्रास्ट्रक्चर उभारण्यात मदत करण्यासाठी आपल्या पेट्रोल पंपांच्या नेटवर्कचा कंपनी वापर करणार आहे.
बीपीसीएल सध्या केवळ 44 ईव्ही चार्जिंग स्टेशन चालवते. परंतु, आणखी 1000 चार्जिंग स्टेशन्स जोडण्याची कंपनीची योजना आहे. पुढील काळात ईव्हीची लोकप्रियता वाढली तर त्यादृष्टीने कंपनी तयारी करत आहे. (दादरच्या कोहिनूर सार्वजनिक पार्किंग संकुलात पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंनी पहिल्या पब्लिक चार्जिंग स्टेशनचं केले उद्घाटन)
गॅस, वीज आणि हायड्रोजनवर चालणाऱ्या वाहनांच्या मालकांना सुविधा देण्यासाठी ही योजना आखण्यात आली आहे. यासाठी 7,000 पेट्रोल पंपांवर किंवा 19,000 आउटलेटच्या जवळपास अनेक इंधनांचे पर्याय उपलब्ध करुन देण्याची कंपनीची योजना आहे.
“इलेक्ट्रिक मोबिलिटीला समर्थन देण्यासाठी आम्ही आमच्या इंधन केंद्रांच्या देशव्यापी नेटवर्कचा लाभ घेऊ. त्यासाठी सुमारे 7,000 पारंपारिक किरकोळ दुकानांना ऊर्जा केंद्रामध्ये रुपांतरित करून पेट्रोल, डिझेल, फ्लेक्सी इंधन, ईव्ही चार्जिंग सुविधा, सीएनजी आणि हायड्रोजन असे अनेक इंधन पर्याय उपलब्ध करून देऊ, ”असे कंपनीचे चेअरमन अरुण कुमार सिंह यांनी सांगितले.
त्याचबरोबर बीपीसीएल पुढच्या पाच वर्षांत 1000 मेगावॅटचे renewable power portfolio तयार करण्यासाठी 5,000 कोटी रुपये खर्च करण्याची योजना आखत असल्याचे सिंह म्हणाले. तर biofuels मध्ये 7,000 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याची कंपनीची योजना आहे. दरम्यान, एचपीसीएल (HPCL) ने मुख्यत: सध्याच्या पंपांवर 5000 विद्युतीय चार्जिंग स्टेशन तयार करण्याची योजना जाहीर केली आहे.