Rahul Gandhi T-shirt |(Photo Credit: Archived, edited, representative images)

राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस आक्रमक झाली आहे. काँग्रेस (Congress) प्रथमच भाजपच्या प्रचाराला आक्रमकपणे भीडताना दिसत आहे. राहुल गांधी यांनी नुकतीच 'भारत जोडो' यात्रा (Bharat Jodo Yatra) सुरु केली. यात्रेदरम्यान राहुल गांधी यांनी परिधान केलेल्या एका टी-शर्टवरुन (Rahul Gandhi T-shirt) भाजपने टीका सुरु केली. या टीकेला काँग्रेसकडून जोरदार प्रत्युत्तर देण्यात आले आहे. खास करुन भाजप आणि काँग्रेस यांच्यात सोशल मीडियावरुन जोरदार युद्ध सुरु झाले आहे. राहुल गांधी यांच्याकडून एका भाषणादरम्यान झालेल्या एका चुकीच्या उच्चारावरुनही भाजपने टीकास्त्र सोडले होते. मात्र, काँग्रेसने त्यालाही जोरदार प्रत्युत्तर दिल्याने प्रकरण बुमरॅंग होताच अनेक भाजप समर्थकांनी राहुल गांधी यांच्याविषयी केलेले ते ट्वट डिलीट केले.

'भारत जोडो' यात्रेदरम्यान, राहुल गांधी यांनी घातलेल्या टी-शर्टवरुन त्यांची खिल्ली उडवत भाजपने म्हटले की 'देखो भारत'. भाजपच्या अधिकृत ट्वीटर हँडलवरुन राहुल गांधी यांचा फोटो आणि त्यांनी वापरलेल्या टी-शर्टचा फोटो किमतीसकट छापून एक पोस्ट शेअर केली. त्याला 'देखो भारत' अशी कॅप्शन दिली. भाजपचा आरोप आहे की, भारत जोडो यात्रेदरम्यान राहुल गांधी यांनी वापरलेल्या टी-शर्टची किंमत 41,257 रुपये आहे. (हेही वाचा, Bharat Jodo Yatra: राहुल गांधी यांची 'भारत जोडो यात्रा' आजपासून सुरु, पहिल्याच दिवशी भाजप, आरएसएसवर निशाणा)

ट्विट

भाजपच्या ट्विटला काँग्रेसकडून प्रथमच इतक्या आक्रमकपणे प्रत्युत्तर दिले जात आहे. काँग्रेस नेत्यांकडूनही भाजपच्या टीकेला जोरदार प्रत्युत्तर दिले जात आहे. टी-शर्टवरुन केलेल्या टीकेला प्रत्युत्तर देताना काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी म्हटले आहे की, आता तर भाजपची दया येत आहे. देशात इतकी मोठी भारत जोडो यात्रा सुरु झाली आहे आणि केंद्रात सत्तेत असलेल्या पक्षाचे लक्ष टी-शर्टवर लटकलेला पाहायला मिळत आहे. पण असो, ही भीती चांगली आहे.