Rahul Gandhi (Photo Credits: Facebook)

काँग्रेस (Congress ) नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी आजपासून (2 सप्टेंबर) 'भारत जोडो यात्रा' (Bharat Jodo Yatra) सुरु केली. या वेळी बोलताना राहुल गांधी यांनी केंद्र सरकार सोबतच भाजप (BJP) आणि आरएसएसवर (RSS) जोरदार हल्ला चढवला. ते म्हणाले, केवळ काँग्रेस पक्षच नाही तर देशातील कोट्यवधी लोकांना भारत जोडो यात्रेची गरज भासत आहे. भाजप आणि आरएसएस देशाला धार्मिक आधारावर आणि भाषांवर विभाजन करत आहे. भारत जोडो यात्रेच्या शुभारंभ रॅलीमध्ये माध्यमांशी बोलताना, राहुल यांनी केंद्रावर टीका केली. केंद्र सरकार सीबीआय आणि अंमलबजावणी संचालनालयासारख्या केंद्रीय एजन्सींचा विरोधकांविरुद्ध सूडाने वापर करत असल्याचा आरोपही त्यांनी केला. आज प्रत्येक संस्था आरएसएस-भाजपच्या नियंत्रणात आहे. या संस्थांवर भाजप, आरएसएस आक्रमण करत आहे. त्यांना वाटते की ते भारताचे धार्मिक आधारावर, भाषेवर विभाजन करू शकतात. पण, या देशाचे विभाजन होऊ शकत नाही. देश भक्कम आहे. तो सदैव एकसंध राहील, असे ते म्हणाले.

भारतीय अर्थव्यस्था सध्या अत्यंत वाईट संकटाचा सामना करत आहे. मूठभर मोठे उद्योग आज संपूर्ण देशावर नियंत्रण ठेवू लागले आहेत. पूर्वी भारतावर नियंत्रण ठेवणारी ईस्ट इंडिया कंपनी होती आणि आज 3-4 मोठ्या कंपन्या आहेत. ज्या संपूर्ण भारतावर नियंत्रण ठेवत आहेत, असे राहुल म्हणाले. (हेही वाचा, Congress Bharat Jodo Yatra: उद्यापासून सुरु होणार काँग्रेसची 'भारत जोडो यात्रा'; पाच महिन्यांत कापले जाणार कन्याकुमारी ते श्रीनगर असे 3,570 किमीचे अंतर)

राहुल गांधी म्हणाले की पंतप्रधान मोदी “मोठ्या उद्योगांना मदत करण्यासाठी धोरणे आणतात जे त्यांना मदत करतात. नोटाबंदी, जीएसटी, शेतीविषयक कायदे हे सर्व त्यांना मदत करण्यासाठी तयार करण्यात आले होते. तिरंगा हा प्रत्येक धर्म, राज्य आणि भाषेचा आहे, परंतु आज भाजप आणि आरएसएसकडून त्यावर हल्ला होत आहे, असेही गांधी म्हणाले.

भारत जोडो यात्रा सुरु करण्यापूर्वी काँग्रेसने म्हटले की, भारतीय राजकारणातील हा एक टर्निंग पॉईंट आहे आणि नवीन सुरुवात आहे. तत्पूर्वी काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी बुधवारी सकाळी श्रीपेरंबुदुर (Sriperumbudur) येथील राजीव गांधी स्मारकातील प्रार्थना सभेत भाग घेतला.