Farm Bills 2020: संसदेच्या पावसाळी अधिवेशनात पारीत केलेल्या कृषी बिलाला (Farm Bill) देशभरातून विरोध होत असून आज शेतकरी संघटनांनी भारत बंदची (Bharat Band) हाक दिली आहे. तसंच याविरोधात शेतकरी संघटना देशव्यापी आंदोलन करणार आहेत. अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीने भारत बंदचे आवाहन केले असून यात देशभरातील शेतकरी संघटना, शेतकरी सहभागी झाले आहेत. भारत बंदमध्ये महाराष्ट्रातील स्वाभिमानी शेतकरी संघटना (Swabhimani Shetkari Sanghatana) देखील सहभागी होणार आहे. या आंदोलनात कृषी विधेयकाच्या प्रतींची होळी करण्यात येईल. तसंच नव्या कृषी विधेयकामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होणार असल्याने भारत बंद आंदोलनात सहभागी होणार असल्याचे संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी सांगितले होते.
कृषी विधेयकाविरोधात पंजाब मधील किसान मजूर संघर्ष समितीद्वारे अमृतसर येथे रेल रोको आंदोलन सुरु आहे. हे आंदोलन 24 सप्टेंबर पासून सुरु झाले असून उद्या म्हणजेच 26 सप्टेंबर पर्यंत सुरु राहणार आहे. (Farm Bills Explained: राज्यसभेत मंंजुर झालेली दोन्ही कृषी विषयक विधेयकं, त्यांंच्या तरतुदी आणि विरोधाची कारणे सविस्तर जाणुन घ्या)
ANI Tweet:
Punjab: Kisan Mazdoor Sangharsh Committee continues their 'rail roko' agitation in Amritsar, in protest against the #FarmBills.
The Committee is holding the 'rail roko' agitation from September 24 to 26 against the Bills. pic.twitter.com/NFfSCcWuO5
— ANI (@ANI) September 25, 2020
दरम्यान पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदरसिंग यांनी शेतकऱ्यांना कायदा आणि नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे. तसंच भारत बंद आंदोलनादरम्यान कोविड-19 च्या नियमांचे पालन करावे, असेही सांगण्यात आले आहे.
ANI Tweet:
Chief Minister Captain Amarinder Singh (in file pic) has appealed to the farmers to strictly maintain law and order, and adhere to all #COVID19 safety protocols, during today’s Bandh against the Agriculture Bills: Punjab Chief Minister's Office (CMO) pic.twitter.com/sHkEat0sH1
— ANI (@ANI) September 25, 2020
या आंदोलनात देशातील 30 हून अधिक शेतकरी संघटना सहभागी होणार आहेत. याशिवाय 10 कामगार सघटनांनी देखील यास पाठींबा दिला आहे. दरम्यान, कृषी विधेयाकाविरुद्ध पुढील दोन महिने आंदोलन करण्याचा इशारा काँग्रेसने दिला आहे.