Death | Representational Image | (Photo Credits: Twitter)

बंगळुरु (Bangalore) मध्ये एका भीषण अपघातात (Accident) गर्भवती महिलेसह 7 जणांंचा जागीच मृत्यु झाल्याची माहिती मिळत आहे. प्राप्त माहितीनुसार, बंंगळुरु येथे कालाबुर्गी (Kalaburagi)  येथील सावालगी (Savalagi) गावाजवळ एक ट्रक उभा होता, या ट्रक ला एका कारची धडक बसली आणि हा अपघात झाला. अपघाताचं स्वरुप जरी सर्वसाधारण वाटत असलं तरी ही धडक इतकी भीषण होती की या मध्ये कारमधील प्रवाशांंचा जागीच मृत्यु झाला. यासंदर्भात आता कालबुर्गी पोलिसांंनी अहवाल नोंंदवुन घेतला आहे. तर हे सातही मृतदेह पोस्टमॉर्टम साठी पाठवण्यात आले आहेत. याशिवाय ट्रकचा पण मागील भाग तुटला असुन कारचा तर अक्षरशः चुराडा झाला आहे. Chhattisgarh Road Accident: छत्तीसगडमधील रायपूर येथे मजूरांची वाहतूक करणाऱ्या बसला अपघात; 7 जणांचा मृत्यू

कार आणि ट्रक च्या या भीषण अपघातातील मृतांंची माहिती पोलिसांंनी मिळवुन त्यांंच्या नातेवाईकांंशी संपर्क साधण्याचे काम सुरु आहे, या मध्ये गर्भवती इरफाना बेगम (वय 25), रुबिया बेगम ( वय 50), आबेडबी (वय 50), जैचुनबी (वय 60), मुनीर (वय 28), मोहम्मद अली (वय 38) आणि शौकत अली (वय 29) यांंचा मृत्यु झाला आहे.

ANI ट्विट

दरम्यान, मागील काही दिवसात महाराष्ट्रात सुद्धा अशाच दोन भीषण अपघातांंची माहिती समोर आली होती, यापैकी पुणे येथील अपघातात तर चक्क एका निवृत्त पोलीस निरिक्षकाने दुचाकीस्वाराला धडक दिली होती, मद्यधुंंद असल्याने हा अपघात झाला होता,ज्यात एकाचा मृत्यु आणि 5 जण गंंभीर जखमी झाले होते. लॉकडाउन काळात रस्ते रिकामी असतील अशी कल्पना करुन अनेकजण भरधाव वाहने चालवतात जे की अपघातांंचे मुख्य कारण ठरत आहे.