Chhattisgarh Road Accident: छत्तीसगडमधील रायपूर येथे मजूरांची वाहतूक करणाऱ्या बसला अपघात; 7 जणांचा मृत्यू
Chhattisgarh Road Accident (PC - ANI)

Chhattisgarh Road Accident: छत्तीसगडमधील  रायपूर येथे मजूरांची वाहतूक करणाऱ्या बसला मोठा अपघात झाला आहे. या अपघातात 7 जणांचा मृत्यू झाला असून 7 जण जखमी झाले आहेत. राजपूरच्या चेरी खेडी येथे आज पहाटेच्या सुमारास हा अपघात झाला.

अपघातग्रस्त बस ओडिशामधील गंजम येथून सुरतकडे जात होती. याच दरम्यान, रायपूरच्या चेरी खेडी येथे ट्रक आणि बसची जोरदार धडक झाली. यात सात जणांचा मृत्यू झाला. तर इतर मजूर जखमी झाले आहेत. यासंदर्भात रायपूरचे पोलिस अधीक्षक अजय यादव यांनी माहिती दिली आहे. (हेही वाचा -Indian Railways च्या इतिहासात कदाचित पहिल्यांदाच; एकट्या प्रवाशाला घरी पोहोचवण्यासाठी Rajdhani Express तब्बल 535 किमी धावली, जाणून घ्या सविस्तर)

प्राप्त माहितीनुसार, अपघातग्रस्त बसमधून मजूरांना ओडिशाच्या गंजम येथून गुजरातमधील सुरत येथे घेऊन जाण्यात येत होतं. या अपघातात जखमी झालेल्या मजूरांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. दरम्यान, ऑगस्टमध्ये छत्तीसगडमध्ये असाच एक अपघात झाला होता. महासमुंद जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्ग 53 वर एका मल्टी युटिलिटी वाहनाच्या अपघातात चार जणांचा मृत्यू झाला होता. तर अनेकजण जखमी झाले होते.