देशातील विविध भागात मिळणाऱ्या वेतनश्रेणींचे अहवाल तपासले असताना रैंडस्टैड संस्थेच्या माहितीनुसार, बंगळुरू (Bangalore) मधील कर्मचाऱ्यांना सर्वाधिक पगार मिळत असल्याचे समोर आले आहे. या भागातील डिजिटल मार्केटिंग (Digital Marketing) क्षेत्र हे प्रगतीच्या दृष्टीने बरेच विस्तृत असून यातील ज्युनिअर, माध्यम श्रेणीच्या आणि वरिष्ठ पदावरील कर्मचाऱ्यांचे पगार हे अन्य शहरांच्या तूलनेत अधिक असल्याचे देखील या रिपोर्ट मध्ये सांगण्यात आले आहे. रैंडस्टैड इनसाइट सैलरी ट्रेंड रिपोर्ट-2019 च्या अनुसार ज्युनिअर स्तरावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना वार्षिक 5.27 लाख इतकी मिळकत आहे, तर हैदराबाद मध्ये 5 लाख रुपये आणि मुंबई मध्ये 4.59 लाख रुपये असे पगाराचे आकडे आहेत.
प्राप्त माहितीनुसार, बंगळुरू मधील मध्यम श्रेणी कर्मचाऱ्यांचा साधारणपणे वार्षिक पगार 16.45 लाख रुपये इतका असून त्यामागोमाग मुंबई मध्ये (15.07 लाख) आणि दिल्ली मध्ये (14.5 लाख) इतके वेतन स्तर आहेत. यासोबतच वरिष्ठ श्रेणीत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना सर्वात अधिक म्हणजे साधारणपणे 35.45 लाख रुपये तर मुंबई मध्ये 33.95 लाख रुपये आणि पुणे येथे 32.68 लाख रुपये पगार मिळतो. (7th Pay Commission News: रेल्वेमध्ये सुरु झाली Clerk पदांसाठी नोकरभरती; 12 वी पास उमेदवार करू शकतात rrccr.com वर अर्ज)
दरम्यान, 2017 आणि 2018 मध्ये सुद्धा बंगळुरू हे शहर पगार श्रेणीत टॉपवर होते.या शहरात आयटी आणि डिजिटल प्लॅटफॉर्मच्या व्यवसायाचा वाढलेला प्रसार पाहता या शहराला देशाचे आयटी हब म्ह्णूनही ओळखले जाते.