Sarkari Naukri / Indian Railways RRB Recruitment 2019: भारतीय रेल्वेमधील तरुणांसाठी एक मोठी संधी उपलब्ध झाली आहे. रेल्वेच्या रेल्वे भरती सेलने (आरआरसी) लिपिक पदाच्या एकूण रिक्त 251 पदांवर भरतीसाठी अर्ज मागविले आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवार www.rrccr.com वर 19 जानेवारी 2020 पर्यंत ऑनलाईन अर्ज करू शकतात.
अधिकृत अधिसूचनेनुसार, ज्युनियर लिपिकच्या 171 आणि सिनियर लिपिकाच्या 80 जागांवर भरती होईल. आज (20 डिसेंबर) दोन्ही प्रवर्गासाठी अर्ज सुरू झाले आहेत. या पदांसाठी उमेदवारांची जास्तीत जास्त वयोमर्यादा 42 वर्षांपेक्षा जास्त नसावी (1 जानेवारी 2020 पर्यंत). तर, ओबीसी आणि अनुसूचित जाती/जमाती उमेदवारांचे वय अनुक्रमे 45 वर्षे आणि 47 वर्षांपेक्षा जास्त नसावे. महत्वाचे म्हणजे या पदांवर अर्ज करण्यासाठी, कोणत्याही उमेदवाराला कोणतीही अर्ज फी भरावी लागणार नाही.
पात्रता –
ज्युनियर लिपीक पदासाठी उमेदवार बारावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. इंग्रजी टाइपिंग गती प्रति मिनिट 30 शब्द आणि हिंदी टाइपिंग गती 25 शब्द प्रति मिनिट असणे गरजेचे आहे. त्याचबरोबर वरिष्ठ लिपीक पदासाठी मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर असणे अनिवार्य आहे.
(हेही वाचा: 7th Pay Commission:रेल्वे कर्मचार्यांसाठी 2019 वर्ष ठरलं लाभदायी; पगारात झाली 'इतकी' दमदार वाढ)
लिपिक भरती परीक्षा -2019 साठी अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा. अधिकृत सूचना वाचण्यासाठी आणि इतर तपशील जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा.
निवड प्रक्रियेदरम्यान, उमेदवारांना संगणक आधारित चाचणी (सीबीटी) तसेच टायपिंग गतीची चाचणी द्यावी लागेल. दोन्ही पदांसाठी फेब्रुवारी महिन्यात परीक्षा अपेक्षित आहे. यातील सर्वात महत्वाची बाब म्हणजे, निवड झालेल्या उमेदवारांना सातवा वेतन आयोगानुसार पगार देण्यात येणार आहे.