7th Pay Commission:रेल्वे कर्मचार्‍यांसाठी 2019 वर्ष ठरलं लाभदायी; पगारात झाली 'इतकी' दमदार वाढ
इंडियन रेलवे (Photo Credits: Facebook)

भारतीय रेल्वेमध्ये काम करणार्‍या लाखो कर्मचार्‍यांसाठी सातव्या वेतन आयोगाच्या शिफारसीनुसार आता मोठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. ते लागू झाल्यानंतर भारतीय रेल्वे कर्मचार्‍यांच्या पगारामध्ये 14% ते 26% वाढ झाली आहे. त्यामुळे वाढत्या महागाईच्या या दिवसांमध्ये ही मोठी दिलासादायक बाब आहे. केंद्रीय रेल्वेमंत्री पीयुष गोयल यांनी नुकतेच संसदेमध्ये रेल्वे कर्मचार्‍यांच्या पगारामध्ये किमान 14% आणि कमाल 26% वाढ झाल्याची माहिती दिली आहे7th Pay Commission: केंद्रिय कर्मचाऱ्यांना नवीन वर्षात मिळणार गिफ्ट; पगारात होणार मोठी वाढ!

पीयुष गोयल यांच्या माहितीनुसार, सातव्या वेतन आयोगाच्या शिफारसीनंतर भारतीय रेल्वेच्या खर्चामध्ये 22 हजार कोटींची वाढ झाली आहे. तर सहाव्या वेतन आयोगानंतर भारतीय रेल्वेच्या खर्चामध्ये 15% वाढ झाली होती.

दरवर्षी रेल्वे कर्मचार्‍यांना फेस्टिव सीझनमध्ये सरकारकडून बोनस जाहीर केला जातो. त्याद्वारा सप्टेंबर महिन्यात दिवाळीपूर्वी सुमारे 78 दिवसांचा पगार दिला जातो. त्याचा फायदा सुमारे11 लाखाहून अधिक कर्मचार्‍यांना मिळतो. तर त्याचा परिणाम अर्थसंकल्पावर सुमारे 2024 कोटी रूपयांचा होणार आहे.

भारतीय रेल्वेकडून 2021 पर्यंत सुमारे 4 लाखाहून अधिक लोकांना नोकरी देण्याचं लक्ष्य आहे. सध्या रेल्वे मध्ये 15.06 लाख पदं आहेत. त्यापैकी 12.23 लाख नियमित कर्मचारी आहेत. त्यापैकी 2.8 लाख्ह पदं रिकामी असून येत्या काही काळात सुमारे 99 हजार अजून पदं रिकामी होणार आहेत. 2018 मध्ये 1 लाख 51 हजार पदांवर नोकरभरतीसाठी प्रक्रिया सुरू होण्याची शक्यता आहे.