War of Words Between Navneet Rana and Asaduddin Owaisi: '15 सेकेंद द्या', 'एक तास घ्या'; नवनीत राणा आणि असदुद्दीन ओवेसी यांच्यात 'वाकयुद्ध'; माधवी लता यांच्याकडून स्पष्टीकरण
Navneet Rana and Asaduddin Owaisi | Photo Credits: Archived, edited, symbolic images)

भारतीय जनता पक्ष (BJP) नेत्या नवनीत राणा (Navneet Rana) यांच्या प्रक्षोभक वक्तव्याला प्रत्युत्तर देताना, ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लीमीन (AIMIM) प्रमुख असदुद्दीन ओवेसी (Asaduddin Owaisi) यांनी गुरुवारी ठामपणे सांगितले की मी त्यांच्या धमक्यांना घाबरत नाही. महाराष्ट्रातील अमरावती लोकसभा मतदारसंघातील भाजप उमेदवार राणा यांनी हैदराबाद लोकसभा मतदारसंघातील भाजप उमेदवार माधवी लता (Maadhavi Latha) यांच्या समर्थनार्थ जाहीर सभेत केलेल्या विधानावरुन वादनिर्माण झाला आहे. आपल्या भाषणात राणा यांनी एआयएमआयएम पक्षाचे नेते अकबरुद्दीन औवैसी यांच्या एका जुन्या वक्तव्यावर भाष्य केले. ज्यामुळे वाद निर्माण झाला.

आम्हाला फक्त 15 सेकंद लागतील

पाठिमागे एकदा खूप काळापूर्वी अकबरुद्दीन औवैसी यांनी 'फक्त 15 मिनीटे पोलीस संरक्षण हटवा, तुम्हाला मुस्लीमांची ताकद दाखवून देतो', अशा आशयाचे वादग्रस्त विधान हिंदू समूहाला उद्देशून केले होते. तोच धागा पकडत हैदराबाद येथील सभेत नवणीत राणा यांनी म्हटले की, "...धाकटा भाऊ (अकबरुद्दीन ओवेसी) म्हणतो "पुलीस को 15 मिनट हटा दो तो हम दिखेंगे की हम क्या कर सकते हैं." मला त्यांना सांगायचे आहे की, तुम्हाला 15 मिनिटे लागली, आम्हाला फक्त 15 सेकंद लागतील. जर तुम्ही 15 सेकंदांसाठी पोलिसांना हटवले, तर 'कहां से आया और कहां गया' हे समजू शकणार नाही... आम्हाला फक्त 15 सेकंद लागतील फक्त 15 सेकंद.." (हेही वाचा: Navneet Rana on Akbaruddin Owaisi’s Speech: 'तुम्हाला 15 मिनिटं पण आम्हाला फक्त 15 सेकंद लागतील'; बालेकिल्ला हैदराबाद मध्ये नवनीत राणा ओवैसी बंधूंवर कडाडल्या)

व्हिडिओ

'मोदींना सांगा, त्यांना 15 सेकंद काय एक तास घ्या'

नवनीत राणा यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया व्यक्त करताना असदुद्दीन ओवेसी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आव्हान दिले. ते म्हणाले की, ''त्यांना 15 सेकंदांऐवजी एक तास द्यावा. तुम्ही काय कराल? तिला 15 सेकंद द्या, तिला 1 तास द्या. आम्हालाही बघायचे आहे की तुमच्यात माणुसकी उरली आहे का. कोणाला भीती वाटते? आम्ही तयार आहोत. ..जर कोणी त्यासाठी खुलेपणाने आव्हान देत असेल तर आम्ही तयार आहोत. आम्ही तुमच्या धमक्यांना घाबरत नाही,' अशी टीका ओवेसी यांनी माध्यमांना संबोधित करताना केली. (हेही वाचा, Navneet Rana: निकृष्ट दर्जाच्या साड्या दिल्या; मेळघाटात नवनीत राणांनी वाटलेल्या साड्यांची आदिवासी महिलांनी केली होळी(Watcha Video))

कोणत्याही आव्हानाला तोंड देण्याची आपली तयारी असल्याचे सांगत ओवेसी यांनी जोर देत पुढे म्हटले की, "आम्हाला कुठे यायचे आहे ते सांगा, आम्ही तिथे येऊ. तुम्हाला हवे ते करा. पंतप्रधान तुमचे आहेत, आरएसएस तुमचे आहे, सर्व काही तुमचे आहे. हवे ते करा. तुम्हाला कोण रोखत आहे?"

आम्ही कोणालाही धमकावत नाही- माधवी लता

नवनीत राणा यांच्या वक्तव्यावर बोलताना हैदराबाद लोकसभा मतदारसंघातील भाजपच्या उमेदवार माधवी लता म्हणाल्या, "... आम्ही कोणालाही धमकावत नाही.. आम्ही 15 मिनिटांसाठी पोलिस बंदोबस्त हटवायला सांगत नाही... आम्हाला फक्त 15 ऐवजी विकासासाठी 15 सेकंद घ्या असे म्हणायचे आहे. भडकावू भाषणात जाऊ नका... जर तुम्हाला 'विकसित भारता'कडे जायचे असेल तर त्यासाठी फक्त 15 मिनिटे लागतील, असे आम्हाला म्हणायचे आहे.

व्हिडिओ

''राणा यांच्या प्रक्षोभक वक्तव्याची चौकशी करा''

दरम्यान, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी राणा यांच्या प्रक्षोभक वक्तव्याची चौकशी करण्याची विनंती निवडणूक आयोगाला केली आहे. शिवसेना (UBT) नेते आनंद दुबे यांनी राणा आणि ओवेसी बंधूंनी जातीय वक्तव्ये कायम ठेवल्याबद्दल टीका केली, फूट पाडणाऱ्या वक्तव्यांच्या पलीकडे जाऊन देशाच्या एकात्मतेवर लक्ष देण्याची आवश्यकता आहे यावर त्यांनी जोर दिला.