Navneet Rana on Akbaruddin Owaisi’s Speech: 'तुम्हाला 15 मिनिटं पण आम्हाला फक्त 15 सेकंद लागतील'; बालेकिल्ला हैदराबाद मध्ये नवनीत राणा ओवैसी बंधूंवर कडाडल्या

2013 मध्ये एआयएमआयएम नेते अकबरुद्दीन ओवेसी यांच्या वादग्रस्त विधानावर भाजप नेत्या नवनीत राणा यांनी ओवैसी बंधूंना त्यांचा बालेकिल्ला असलेल्या हैदराबादमध्ये सडेतोड प्रत्युत्तर दिले आहे.

Navneet Rana on Akbaruddin Owaisi’s Speech: 'तुम्हाला 15 मिनिटं पण आम्हाला फक्त 15 सेकंद लागतील'; बालेकिल्ला हैदराबाद मध्ये नवनीत राणा ओवैसी बंधूंवर कडाडल्या
Navneet Rana | File Photo

Navneet Rana on Akbaruddin Owaisi’s Speech: AIMIM नेते अकबरुद्दीन ओवैसी(Akbaruddin Owaisi)यांनी 2013 मध्ये एका भाषणादरम्यान, '१५ मिनिटे पोलीस हटवा आम्ही काय करू शकतो, हे दाखवून देऊ', असे वादग्रस्त विधान केले होते. त्यावर भापज (BJP) उमेदवार नवनीत राना (Navneet Rana)यांनी प्रत्यूत्तर दिले आहे. 'तुम्हाला १५ मिनिटे लागतील आम्हाला १५ सेकंद लागतील', असे नवनीत राणा म्हणाल्या. बुधवारी त्यांनी भाजपच्या हैद्राबादच्या उमेदवार माधवी लता यांच्या प्रचारासाठी हजेरी लावली होती. त्या दरम्यान, सभेला संबोधीत करताना त्यांनी ओवैसी बंधूंवर चांगलीच तोफ डागली. (हेही वाचा:Navneet Rana: निकृष्ट दर्जाच्या साड्या दिल्या; मेळघाटात नवनीत राणांनी वाटलेल्या साड्यांची आदिवासी महिलांनी केली होळी(Watcha Video))

त्यांचा छोटा भाऊ (अकबरुद्दीन ओवैसी) यांनी म्हटलं होतं की, ''१५ मिनिटांसाठी पोलीस हटवा मग पाहा आम्ही काय करतो. मला त्यांना सांगायचं आहे. त्यांना १५ मिनिट लागतील, पण आम्हाला १५ सेकंद लागतील. जर १५ सेकंदांसाठी पोलीस हटवले तर तुम्हाला कळणार देखील नाही कुठून आलो आणि कुठे गेलो. फक्त १५ सेकंद लागतील.''

दरम्यान,एआयएमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी तेथून चार वेळा लोकसभा खासदार राहीले आहेत. आता ही ते तेथून निवडून येतील अशी चर्चा आहे. हैदराबादमधून भाजपने पहिल्यांदाच महिला उमेदवार दिला आहे. असदुद्दीन हे 2004 पासून हैदराबादचे निवडून आलेले लोकप्रतिनिधी आहेत. यापूर्वी ते अविभाजित आंध्र प्रदेशात दोनदा आमदार म्हणून निवडून आले होते.

(The above story first appeared on LatestLY on May 09, 2024 12:16 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).