Navneet Rana: निकृष्ट दर्जाच्या साड्या दिल्या; मेळघाटात नवनीत राणांनी वाटलेल्या साड्यांची आदिवासी महिलांनी केली होळी(Watcha Video)
खासदार नवनीत राणांनी काही दिवसांपूर्वी मेळघाटात आदिवासी महिलांना साड्यांचं वाटप केलं होतं. मात्र, त्या इतक्या नितकृष्ठ दर्जाच्या होत्या की, आदिवासी महिलांनी त्या साड्यांची होळी केली. निकृष्ट दर्जाच्या साड्या वाटल्यामुळे या महिलांनी संताप व्यक्त केला आहे.
MP Navneet Rana: लोकसभा निवडणूका तोंडावर आल्या आहेत. त्यामुळे राजकारण्यांकडून वस्तूंचं जोरदार वाटप सुरू आहे. मात्र त्या कारणामुळे मेळघाटातील आदिवासी महिला (Tribal Women)खासदार नवनीत राणा विरोधात आक्रमक झाल्या आहेत. निकृष्ठ दर्जाच्या साड्या दिल्याचा (Sarees Distributed) आरोप आदिवासी महिलांनी खासदार राणांवर(Navneet Rana) केला आहे. त्यामुळए राणांनी वाटलेल्या साड्यांची आदिवासी महिलांनी होळी केली आहे. बामादेही, कोरडा, चुरणी,ढाणा या गावात आदिवासी महिलांनी साड्यांची होळी केली (Tribal Women Celebrated Holi) आहे. (हेही वाचा : Navneet Rana Death Threat : खासदार नवनीत राणा यांना जीवे मारण्याची धमकी; पाकिस्तानमधून व्हॉटसअॅपवर पाठवली ऑडिओ क्लिप)
राणा दाम्पत्यांनी वाटलेल्या साड्या निकृष्ट दर्जाच्या असून त्या अजिबात घालण्याच्या लायकीच्या नाही, असा संताप देखील आदिवासी महिलांनी व्यक्त केला आहे.#Amravati #NavneetRana #RaviRana #maharashtra pic.twitter.com/ZuC10WriWw
— Satish Daud Patil (@Satish_Daud) March 12, 2024
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Mar 25, 2024 10:21 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

