पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (14 एप्रिल) देशातील लॉकडाऊन अजून 19 दिवसांनी वाढवण्याचा निर्णय जाहीर केला आहे. त्यामुळे 3 मे पर्यंत भारतामध्ये कोरोना व्हायरस लॉकडाऊन कायम राहणार आहे. दरम्यान या काळात आता देशांर्गत आणि आंतरराष्ट्रीय विमानसेवा देखील बंद राहणार असल्याची माहिती केंद्रीय हवाई मंत्रालयाकडून देण्यात आली आहे. भारतामध्ये 22 मार्चच्या मध्यरात्रीपासून आंतरराष्ट्रीय तर लॉकडाऊनच्या दरम्यान देशंर्तगत विमानसेवा बंद करण्यात आली होती. आता हाच निर्णय पुढे कायम ठेवला जाणार आहे.
भारतामध्ये कोरोनाबाधितांचा आकडा 10,000 च्या पार गेला आहे. आज आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, भारतामध्ये एकूण 10,363 कोरोनाबाधित असून 8988 जणांवर उपचार सुरू आहेत. 1036 जण कोरोनामुक्त झाले असून 339 लोकांनी आपला जीव गमावला आहे. दरम्यान मुंबई, दिल्ली सारख्या आंतरराष्ट्रीय विमानतळांवर प्रवाशांची संख्या अधिक असते त्यामुळे या भागात कोरोनाबधितांचा आकडादेखील अधिक आहे. यापार्श्वभूमीवर येथील कोरोनाग्रस्तांची संख्या नियंत्रणात आणण्यासाठी हे महत्त्वाचं पाऊल ठरू शकते. दरम्यान आज भारतातील 21 दिवसांचा लॉकडाऊन संपेल या आशेवर काही देशांर्गत विमानसेवा देणार्या कंपन्यांनी तिकीट बुकिंग आणि भाविष्यातील प्लॅन जाहीर केला होता. मात्र तुर्तास भारतीयांना 3 मे पर्यंत विमानप्रवास करता येणार नाही. SpiceJet कडून Happy At Home Sale ची घोषणा; 939 रूपयांंत विमान प्रवास सोबत रिशेड्युलची मुभा! जाणून घ्या काही खास ऑफर्स.
ANI Tweet
All domestic and international scheduled airline operations shall remain suspended till 11.59 pm, 3rd May: Ministry of Civil Aviation pic.twitter.com/dJaOJfVMzJ
— ANI (@ANI) April 14, 2020
विमानसेवेप्रमाणेच भारतीय रेल्वे सेवेकडून प्रवासी रेल्वे वाहतूक 3 मे नंतर सुरू केली जाईल अशी माहिती देण्यात आली आहे. दरम्यान सध्या महाराष्ट्रातही सीमा बंदी असल्याने नागरिकांना अपवादात्मक स्थिती वगळता राज्यामध्येही प्रवास करण्यास अनुमती नाही.