Samajwadi Perfume | (Photo Credit: Archived, edited, representative images)

समाजवादी पक्षाचे (Samajwadi Party) अध्यक्ष अखिलेश यादव यांनी 'समाजवादी अत्तर' (Samajwadi Perfume) लॉन्च केले आहे. परफ्यूमची बॉटल आणि बॉक्स लाल आणि हिरव्या रंगात आहेत. या अत्तरच्या डब्यावर अखिलेश यादव (Akhilesh Yadav) यांचा फोटोही आहे. कन्नौज येथील समाजवादी पक्षाचे आमदार पम्मी जैन यांनी हे अत्तर (Samajwadi Attar) तयार  केले आहे. जैन यांचे म्हणने आहेकी, हे अत्तर 2022 मध्ये उत्तर प्रदेशमधील नकारात्मकता संपवेन. हे अत्तर बनविण्यासाठी 2 संशोधकांना 4 महिन्याचा कालावधी लागला. या अत्तरची विशेषता अशी की या अत्तरात कश्मीर ते कन्याकुमारीपर्यंतच्या 22 अत्तरांचा समावेश केला आहे.

अखिलेश यादव यांनी नोटंबदीच्या काळात मिळालेली 'खंजाची' मुलाचा पाचवा वाढदिवस समाजवादी पक्षाच्या मुख्यालयात मंगळवारी (9 नोव्हेंबर) साजरा केला. या वेळी अखिलेश यांनी खजांचीला अत्तरची बाटली दिली. अखिलेश यादव यांनी या वेळी उपस्थितांशी संवाद साधला. अखिलेश यादव यांनी म्हटले की, भाजपने ट्रिपल इंजिनचे सरकार न्यायायाच विजय होऊ देणारन नाही. लखीमपूर खीरी प्रकरणात आणि सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केलेल्या मतावर म्हटलेकी, आज सर्वोच्च न्यायालयाने उत्तर प्रदेश सरकारवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. (हेही वाचा, Uttar Pradesh Politics: अखिलेश यांची सायकल धावणार? शिवपाल यादव समाजवादी पक्षात 'घरवापसी' करण्यास तयार, मात्र एका अटीवर)

अखिलेश यादव यांनी म्हटले की, एसआयटी राज्य सरकारची आहे. एसआयटी तेच करेल जे राज्य सरकार त्यांना सांगेल. मी एक गोष्ट सांगू इच्छितो की, 2022 मध्ये परिवर्तन होईल आणि न्यायही होईल. उत्तर प्रदेशमधील कायदा सुव्यवस्थेवर टीका करत म्हटले की, अखिलेश यांनी म्हटले की, फतेहगढ जिल्ह्यात काय घडले? कैद्यांनी जेलरला चोपले. यावरुनच उत्तर प्रदेशमधील कायदा व सुव्यवस्था समोर येते आहे.