एअर इंडिया (Air India) पाठीमागील काही दिवसांपासून सातत्याने या ना त्या कारणामुळे चर्चेत आहे. कधी विमानाने उशीरा उड्डाण केल्याने कधी प्रवाशांना पाठिमागेच ठेऊन विमाने उड्डान केल्याने. आता तर चक्क विमानामध्ये प्रवाशाच्या जेवनात किडे सापडल्याची घटना पुढे आली आहे. प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, मुंबई ते चेन्नई प्रवास (Mumbai-Chennai Journey) करणाऱ्या एअर इंडियाच्या विमानातील बिझनेस क्लासने प्रवास करणाऱ्या प्रवाशाच्या जेवणात किडे आढळून आल्या आहेत. या घटनेचा व्हिडिओही (Air India Viral Video) सोशल मीडियात व्हायरल झाला आहे. दरम्यान, सेलिब्रेटी शेफ संजीव कपूर यांनी या आधी एअर इंडियाच्या फ्लाइटमध्ये त्यांना दिल्या जाणाऱ्या जेवणाच्या गुणवत्तेबद्दल तक्रार केली होती.
एअर इंडियामध्ये घडलेल्या सदर घटनेबाबत प्रवाशाने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरवर एक व्हिडिओही शेअर केला आहे. या व्हिडिओत जेवणात किडे सापडल्याचे म्हटले आहे. घडल्या प्रकाराबद्दल एअर इंडियाने माफी मागितल्याचेही समजते. दरम्यान, व्हिडिओत पाहायला मिळते की, अन्न देण्यात आलेल्या प्लेटमध्ये काही किडे हालचाल करत आहेत. महावीर जैन नामक युजरने @mbj114 या ट्विटर हँडलवरुन हा व्हिडिओ शेअर केला आहे. (हेही वाचा, Air India Recruitment: नवीन विमान खरेदी केल्यावर एअर इंडियाची नोकर भरतीची योजना; लवकरच 4,200 केबिन क्रू आणि 900 पायलटना घेणार कामावर)
दरम्यान, जैन यांनी केलेल्या तक्रारीवर एअर इंडियाने तातडीने प्रदिसाद देत प्रतिक्रिया दिली आहे. प्रतिक्रियेत म्हटले आहे की, प्रिय श्रीयुत जैन, आमच्यासोबत उड्डाण करतानाचा तुमचा अनुभव लक्षात घेता आम्ही दिलगीर आहोत. आमच्याबद्दल जे काही घडल्याचे कथन केले जात आहे ते ऐकायला काही चांगलं नाही. आम्ही प्रत्येक टप्प्यावर स्वच्छता सुनिश्चित करण्यासाठी उपायांचे काटेकोरपणे पालन करतो, तरीही असे काही घडले असल्यास आम्ही दिलगीर आहोत.
ट्विट
@airindiain insect in the meal served in businessclass pic.twitter.com/vgUKvYZy89
— Mahavir jain (@mbj114) February 27, 2023
दरम्यान, महावीर जैन यांनी शेअर केलेल्या व्हिडिओखाली युजर्सनी प्रतिक्रिया देत त्यांची नाराजी दर्शवली. काही युजर्सनी म्हटले की, प्रवासी आरामदायी उड्डाणासाठी इतके पैसे मोजत असताना अशी सेवा अजिबातच अपेक्षित नव्हती. काहींनी म्हटले की, प्रवासी जेवढे पैसे देतात किमान तेवढी तरी सेवा द्या.