![](https://mrst1.latestly.com/uploads/images/2024/09/crime-4-1-380x214.jpg?width=380&height=214)
Punjab Shocker: शनिवारी रात्री उशिरा सशस्त्र दरोडेखोरांनी आम आदमी पक्षाचे नेते आणि प्रख्यात उद्योगपती अनोख मित्तल (Anokh Mittal) यांच्या पत्नी लिप्सी मित्तल यांची निर्घृण हत्या (Murder) केली. हे जोडपे डेहलो येथील जेवणावरून घरी परतत असताना हा हल्ला झाला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सिधवान कालव्याच्या पुलाजवळील रुरका गावाजवळ सुमारे पाच सशस्त्र दरोडेखोरांनी मित्तल दाम्पत्याच्या गाडीला अडवले. धारदार शस्त्रांनी सज्ज असलेल्या हल्लेखोरांनी या जोडप्यावर क्रूर हल्ला केला. अनोख मित्तलने प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला असता, ते हल्ल्यात गंभीर जखमी झाले. सध्या त्याच्यावर डीएमसी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
या क्रूर हल्ल्यात लिप्सी मित्तल यांना आपला जीव गमवावा लागला. त्यांना घटनास्थळीच मृत घोषित करण्यात आले. दरोडेखोर मित्तल कुटुंबाची गाडी आणि इतर सामान घेऊन पळून गेले. पोलिसांनी घटनेचा तपास सुरू केला आहे. आम्ही सर्व बाजूंनी घटनेचा तपास करत आहोत आणि गुन्हेगारांवर कठोर कारवाई करू, असे एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने सांगितले. (हेही वाचा - Mumbai Murder Case: डोंगरी परिसरामध्ये भांडणाच्या रागामधून डोक्यात दगड घालून हत्या)
प्रसिद्ध व्यापारी अनोख मित्तल यांनी सुमारे चार महिन्यांपूर्वी 'आप'मध्ये प्रवेश केला होता. पक्षाशी असलेल्या त्यांच्या सहभागामुळे व्यावसायिक आणि राजकीय वर्तुळात मित्तल कुटुंबाचे लक्ष वेधले गेले होते.