Representational Image (File Photo)

मुंबई मध्ये डोंगरीच्या शालीमार हॉटेल जवळ एका भययंकर प्रकार घडला आहे. 2 दिवसांपूर्वी झालेल्या भांडणाच्या रागामधून जूमराती मोहम्मद शेख नामक व्यक्तीचा डोक्यात दगड घालून खून झाला अअहे. ही घटना पूर्ववैमनस्यातून झाली आहे. शंकर सोनवणे उर्फ दामू याने ही हत्या केली आहे. या प्रकरणी जे जे मार्ग पोलीस ठाण्यात शंकर सोनवणे विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याला पोलिसांनी अटक देखील केली आहे. सध्या जे जे मार्ग पोलिस स्टेशनकडून या प्रकरणी अधिक तपास सुरू आहे.

दोन दिवसांपूर्वीच शंकर आणि जुमराती यांच्यात खडाजंगी झाली होती. तोच राग डोक्यात ठेवत शंकर सोनवणेने जूमराती झोपलेला असताना त्याच्या डोक्यात दगड घालून त्याची निर्घृण हत्या केली.

त्यानंतर पोलीस घटनास्थळी आले . त्यांनी मृतदेह ताब्यात घेऊन घटनेचा पुढील तपास सुरू केला असून शंकर सोनवणेला अटक करण्यात आली आहे.

दरम्यान मुंबईत काही दिवसांपूर्वीच वांद्रे टर्मिनस वर एका महिलेवर कुली कडून अत्याचार झाल्याचा प्रकार समोर आला आहे. महिला एकटी रिकाम्या ट्रेन मध्ये झोपलेली पाहून तिच्यावर बलात्कार झाला. त्यमुळे महिला सुरक्षेचा विचय ऐरणीवर आला आहे. वर्दळीच्या वांद्रे स्थानकावर बलात्काराची घटना झाल्याने आता सुरक्षितता आणि लॉ अ‍ॅन्ड ऑर्डर मुंबईत ढासळते आहे का? असा प्रश्न विचारला जात आहे.