Road Accident

Uttar Pradesh Accident: उत्तर प्रदेशातील कन्नौजमध्ये एका डीसीएम ट्रकने उभ्या असलेल्या दुसऱ्या ट्रकला धडक दिली. या धडकेत 4 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. हा अपघात भीषण होता. अपघातात इतर एक जण गंभीर जखमी झाले आहे. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघाताची माहिती मिळताच, घटनास्थळी बचावकार्य सुरु झाले. अपघातानंतर रस्त्यावर बराच वेळ वाहतुक कोंडी निर्माण झाली. हेही वाचा- स्कूल बसजवळ शॉर्टसर्किटमुळे विजेची तार तुटली, विद्यार्थी थोडक्यात बचावले, मध्य प्रदेशातील इंदूरमध्ये घटना

मिळालेल्या माहितीनुसार, हा अपघात कन्नौज येथील रस्त्यावर घडला आहे. या अपघातानंतर सीएम योगी आदित्यनाथ यांनी शोक व्यक्त केला आहे. जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. हा अपघात इतका भीषण होता की, यात ट्रकचा चुराडा झाला आहे. डीसीएम ट्रक भरधाव वेगाने आला. तेथे उभा असलेला दुसऱ्या ट्रकला धडक दिली. ही धडक इतकी भयंकर होती की, ट्रक दुसऱ्या बाजूला पटली झाला.

अपघाताची माहिती मिळताच, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी जिल्हा प्रशासनच्या अधिकाऱ्यांसह घटनास्थळी पाहणी केली. घटनास्थळी पोहोचून मदतकार्य सुरु केले. कन्नौज जिल्ह्यातील गुरसहायगंज कोतवाली भागातील जुनेदपूर गावाजवळ शुक्रवारी सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास दिल्लीहून कानपूरच्या दिशेने जात असताना ट्र्क चालकाने वाहनं सर्व्हिस रोडवर उभा केला होता. तो केबिनमध्येच झोपला. सकाळी मागून येणारा डीसीएम उभ्या असलेल्या ट्रकला धडकला. त्यात प्रवास करणाऱ्या चार जणांचा मृत्यू झाला, तर एक जण जखमी झाला.

घटनास्थळी गुरसहायगंज पोलिस ठाण्याचे अधिकारी आलोक दुबे आणि माझपुरवा श्याम पाल सिंह घटनास्थळी पोहोचले. स्थानिकांच्या व महामार्गावरील कर्मचाऱ्यांच्या मदतीने त्यांनी डीसीएमच्या डीसीएमच्या केबिनमध्ये अडकलेल्या लोकांना क्रेनच्या साहाय्याने बाहेर काढले.