दोन मुलांची हत्या करून एका व्यक्तीची आत्महत्या; बेरोजगाराला वैतागून केले हे कृत्य ; 9 फेब्रुवारी 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE
बातम्या
Bhakti Aghav
|
Feb 09, 2020 09:37 PM IST
आजचा दिवस (9 फेब्रुवारी) काही विशेष घडामोडींमुळे महत्त्वाचा ठरणार आहे. आज पाकिस्तानी व बांगलादेशी घुसखोरांविरुद्ध महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने महामोर्चा काढण्यात येणाऱ्या आहे. या मोर्चात अनुचित घटना घडू नये यासाठी पोलिसांकडून कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
मुंबईतील हिंदू जिमखान्यापासून सुरु होणारा मोर्चा आझाद मैदानावर येऊन धडकणार आहे. तसेच पक्षप्रमुख राज ठाकरे यांच्या भाषणाने मोर्चाची सांगता होणार आहे. त्यामुळे या सांगता सभेत राज ठाकरे काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तसेच चीनमध्ये कोरोनाची लागण झाल्यामुळे अनेकांना आपला जीव गमवावा लागत आहे. दिल्ली प्रवासात उलट्या झालेल्या चिनी नागरिकासह तिघांची शनिवारी तपासणी करण्यात आली. सुदैवाने ही चाचणी 'निगेटिव्ह' आल्याचे राष्ट्रीय विषाणू संस्थेने (एनआयव्ही) स्पष्ट केले आहे. सध्या पुण्यासह राज्यातील विविध भागांतून येणाऱ्या प्रवाशांचा पाठपुरावा करण्यात येत आहे.
आजच्या दिवसभरातील ठळक बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचण्यासाठी 'लेटेस्टली मराठी' ला अवश्य भेट द्या.
तसेच शनिवारी दिल्ली विधानसभा निवडणुकांसाठी मतदानाची प्रक्रिया पार पडली. त्यामुळे आता दिल्लीमध्ये कोणाची सत्ता स्थापन होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. शनिवारी झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत सरासरी 58 टक्के मतदान झाले. दिल्ली निवडणुकीचा निकाल मंगळवारी लागणार आहे. परंतु, सर्व मतदानोत्तर चाचण्यांतून पुन्हा आम आदमी पक्षालाच बहुमत मिळेल, असा अंदाज वर्तविण्यात येत आहे.