मुंबई उच्च न्यायालयाने अंमलबजावणी संचालनालयावर सोमवारी (8 मार्च) प्रश्नांची सरबत्ती केली. एकनाथ खडसे जर चौकशीला पूर्ण सहकार्य करत आहेत तर मग त्यांना अटक कशासाठी करायला हवी? असा सवाल न्यायालयाने ईडीला विचारला. एकनाथ खडसे यांनी अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) विरोधात केलेल्या याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयाने सुनावणी घेतली. या वेळी न्यायालयाने ईडीला हा सवाल विचारला.

ड्रेनेज बांधताना भींत कोसळून सहा मजूर ठार झाले. बिहारच्या खागारिया चंडी टोला येथे ही घटना घडली आहे. भिंतीखाली आणखीही काही लोक अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. मदत आणि बचाव कार्य सरु आहे.

अहवालानुसार आज रात्री 9 वाजेपर्यंत एकूण 2,26,85,598 लसीचे डोस देण्यात आले आहेत. देशभरातील कोरोना विषाणू लसीकरणाच्या आजच्या 52 व्या दिवशी रात्री 9 वाजेपर्यंत एकूण 16,96,588 लस डोस देण्यात आल. आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाने ही माहिती सांगितली आहे.

महाराष्ट्र: गोंदिया-बल्हारशाह रेल्वे मार्गावर मालगाडीच्या धडकेत गोंदियामध्ये एका वाघाचा मृत्यू  झाला.

Madhya Pradesh: बालाघाट जिल्ह्यात गोळीबार झाल्यावर मध्य प्रदेश पोलिसांच्या हॉक फोर्सने नक्षलवाद्याला अटक केली. मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि महाराष्ट्र पोलिसांनी जाहीर केलेले 14 लाख रुपयांचे बक्षीस या नक्षलवाद्यावर होते.

महाराष्ट्रात गेल्या 24 तासात 8744 जणांना कोरोना व्हायरस संक्रमण झाले आहे. तर, 9068 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे, अशी माहिती राज्याच्या आरोग्य विभागाने दिली आहे. आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीचा तपशील खालीलप्रमाणेTotal cases 22,28,471
Total recoveries 20,77,112
Death toll 52,500Active cases 97,637

कर्नाटकमध्ये महिलांना कोरोना लसिकरणासाठी Pink Vaccination Booth उभारण्यात आले आहेत. International Womens Day निमित्त तिथल्या सरकारने हा उपक्रम राबवला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून भारत आणि बांगलादेश यांच्यातील ‘मैत्री सेतु’ (‘Maitri Setu’ ) चे उद्घाटन करतील. या कार्यक्रमाच्या दरम्यान ते त्रिपुरामध्ये अनेक पायाभूत सुविधांच्या प्रकल्पांचे उद्घाटन व शिलान्यासही करणार आहेत.

मुंबई शहरात आज सायंकाळी 6 वाजेपर्यंत 1008 जणांना कोरोना व्हायरस संक्रमण झाले. तर 956 जणांना डिस्चार्ज मिळाला. संपूर्ण दिवसात कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या 4 इतकी असल्याची माहिती मुंबई महापालिकेने दिली आहे.

इंधन दरवाढीवरुन विरोधकांनी लोकसभा सभागृहात आक्रमक पवित्रा घेतला. त्यानंतर लोकसभा सभागृह एक दिवसासाठी तहकूब करण्यात आले.

Load More

आज (8 मार्च) पासून दिल्लीत संसदेत अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा दुसरा भाग सुरू होत आहे. तर महाराष्ट्रामध्ये आज राज्याचा अर्थसंकल्प मांडला जाणार आहे. आज महाविकास आघाडी सरकार त्यांच्या कार्यकाळातील दुसरं बजेट विधिमंडळात सादर करेल. राज्याचे अर्थमंत्री अजित पवार आज हा अर्थसंकल्प मांडतील. सामान्यांना या अर्थसंकल्पामध्ये कोविड 19 लसीकरण, शेती ते इंधना दर यांच्याबद्दल काय घोषणा होणार? याकडे जनसामान्यांचे लक्ष असेल.

दरम्यान आज 8 मार्च आहे. हा दिवस जगभरात जागतिक महिला दिन म्हणून साजरा केला जातो. या दिवसाचं औचित्य साधत जगभरातील महिला शक्तीला सलाम केला जातो. जगाच्या जडणघडणीमध्ये त्यांचं असलेलं अस्तित्त्व आणि महत्त्व अधोरेखित करण्याचा आजचा दिवस आहे.

आजच्या दिवसभरातील मुंबई, पुणे, नाशिक सह देशा-परदेशातील महत्त्वाच्या घडामोडी, ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी लेटेस्टली मराठी ला नक्की भेट द्या.

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी ते अनेक मातब्बर राजकारण्यांनी सुद्धा जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा देत आजचा दिवस खास केला आहे. भारतामध्ये अनेक महत्त्वाच्या स्थळी महिला दिनाचं औचित्य साधत ऐतिहासिक वास्तूंवर गुलाबी, जांभळ्या रंगाची रोषणाई केली आहे.