Live
तेलंगणा मध्ये 19 हजार फ्रंटलाईन वर्कर्सला कोरोनाची लस दिली गेली; 8 फेब्रुवारी 2021 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE
बातम्या
टीम लेटेस्टली
|
Feb 08, 2021 11:43 PM IST
उत्तराखंड मध्ये जोशी मठ परिसरामध्ये काल हिमकडा कोसळल्याने मोठी दुर्घटना घडली आहे. या भागात धौलीगंगा नदीवरीला ऋषी गंग़ा पॉवर प्रोजेक्टवर नुकसान झालेले आहे. यामध्ये 130 पेक्षा अधिक लोकं अडकली आहेत. त्यांना बचावण्यासाठी आयटीबीपी जवान युद्धपातळीवर प्रयत्न करत आहेत. सध्या बोगद्यामध्ये अडकलेल्यांना वाचवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
आंतरराष्ट्रीय स्तरावरून आता या दुर्घटनेत बळी गेलेल्यांना श्रद्धांजली अर्पण केली जात आहे.
दरम्यान जगभरात भारताकडून लस पोहवण्याचं काम सुरू आहे. यामध्ये आज मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून Barbados & Dominica मध्ये लसी रवाना झाल्या आहेत. भारतामध्येही 55 लाखापेक्षा अधिक लोकांना लस देण्यात आल्या आहेत.
आजच्या दिवसभरातील मुंबई, पुणे, नाशिक सह देशा-परदेशातील महत्त्वाच्या घडामोडी, ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी लेटेस्टली मराठी ला नक्की भेट द्या.
मिरारोड परिसरामध्ये आज मध्यरात्री सिलेंडरचा भीषण स्फोट झाला आहे. ही आग शांती गार्डन परिसरात लागली होती. दरम्यान सिलेंडरच्या गाड्या देखील भरलेल्या असलेल्याने मोठ्या प्रमाणात आगीचा स्फोट झाला आहे मात्र आता आग नियंत्रणामध्ये आहे.